नवी मुंबई

बेलापूर विभागात अनधिकृत झोपडयांवर धडक मोहिम

नवी मुंबई:महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने बेलापूर विभाग कार्यक्षेत्रात अनधिकृत झोपडया निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील, सेक्टर-30, नेरुळ नवी मुंबई, विठ्ठल रुक्मीणी मंदिरासमोरील सिडकोच्या भुखंडावरील असलेल्या अनधिकृत झोपडया स्वत:हून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत झोपडया स्वत:हून हटवून न घेतल्याने निष्कासनाची कारवाई सुरु करण्यात आली. सदर कारवाईमध्ये सेक्टर-28,नेरुळ नवी मुंबई, विठ्ठल रुक्मीणी मंदिरासमोरील सिडकोच्या भुखंडावरील अनधिकृत झोपडया-05 निष्कासित करण्यात आलेल्या आहेत.

सदर अनधिकृत झोपडयांवर अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन सदर अनधिकृत झोपडयांवर निष्कासित कारवाई करण्यात आली आहे. या धडक मोहिमेसाठी अे विभाग कार्यालय अंतर्गत बेलापूर विभागातील, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, प्रशांत नेरकर, सहा. अभियंता आत्माराम काळे व स्वप्निल तारमळे विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर मोहिमेसाठी मजूर-08 इत्यादी मनुष्यबळ व साधनसामुग्री वापरण्यात आली. तसेच अतिक्रमण विभागातील पोलिस अधिकारी व कर्मचारी व सुरक्षारक्षक उपस्थित होते. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *