संपादकीय

न भयम्, न लज्जा

आज आपल्या महाराष्ट्रातील महानगरपालिकांचा महाप्रचार सायंकाळी थांबणार आहे. यानंतर महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये काय होते याचा विचार पुढे करू. पण नुकत्याच संपन्न झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर जे काही राजकारण सुरू आहे ते पाहिल्यावर आपला महाराष्ट्र कुठे चालला आहे हेच समजत नाही….

ग्रामीण आरोग्य चळवळीच्या प्रणेत्या

ग्रामीण भागात तालुका म्हणून ओळख मिरवणारी अनेक शहरे कधी जिल्ह्याइतकी मोठी झाली, हे कळलेच नाही. शहरांमध्ये माणसं वाढली; मात्र जमिनी आणि ‘तालुका’ नावाचा शिक्का तसाच कायम राहिला. परिणामी प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा पुरवणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे हे कुठल्याही…

किडनीतील काटे आणि कंगोरे

चंद्रपूर जिल्ह्यातील ३६ वर्षीय पीडित शेतकरी रोशन कडू यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केलेले वक्तव्य अतिशय गंभीर आहे. हे प्रकरण शेतकऱ्याची किडनी काढण्यापुरते मर्यादित नाही; कर्जपायी या गरीब शेतकऱ्याने आपली किडनी विकली. हे सत्य असले तरी, अशा लोकांना शोधून त्यांच्या…

सामाजिक जाणिवांच्या कक्षेतून समाजसेवा

घरच्या समृध्द अशा औषध व केमिकलच्या व्यवसायात व्यस्त असताना, समाजसेवक सुनील दावडा यांच्या मनाने घेतले की, स्वतःसाठी जगत असताना आपले आयुष्य घडविण्यात ज्या समाजाचे ऋण आपल्यावर आहे ते आपण होईल त्यापरीने फेडले पाहिजे. सेवाभावी वृत्तीचे वडील ईश्वरलाल दावडा यांची प्रेरणा…

देवाभाऊंचा मोठेपणा

महाराष्ट्राचे तरुण तुर्क आणि तडफदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उर्फ देवाभाऊ यांनी अगदी देवाच्या तोंडात शोभेल असे विधान केलेले आहे. त्यांनी तसे विधान करून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केलेच पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष…

उत्स्फूर्त, अभ्यासू, दिलखुलास मुलाखतकार अश्विनी कोळेकर

घरातील वाचनसंस्कृतीच्या संस्कारातून शब्दातील नेमकेपणा, भाषाशैली आणि संवादकौशल्य विकसित झाले. त्याला अनुभवाची आणि शिक्षणाची जोड देत उत्स्फूर्त व नैसर्गिकपणे समोरच्याला बोलतं करत विषय खुलविण्याचं कसब ज्यांनी स्वतःमध्ये निर्माण केलं आहे, अशा सर्वव्यापी मुलाखतकार म्हणून अश्विनी कोळेकर आज सर्वांच्या परिचयाच्या आहेत….

शेतकऱ्यांचे मातीपर्व

आज एक विशेष अहवाल आमच्या वाचनात आला. मान्सूनपूर्व कापसाच्या बियाण्याची लागवड केल्यावर शेतकऱ्यांना तीन ते साडेतीन क्विंटल कापसाचे उत्पन्न मिळालेले आहे. मान्सून पूर्व लागवडीचा खर्च जास्त असतो कारण त्याला ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे लागते आणि त्यासाठीही बराच खर्च येतो. मान्सूनपूर्व…

साहित्य, आर्थिक साक्षरता आणि स्त्री सक्षमीकरणाचा सुंदर मिलाफ

शिक्षण, उद्योग आणि साहित्य यांचा अनोखा संगम असणाऱ्या शोभा मोरे या महाराष्ट्र राज्यासाठी अभिमानाचा विषय आहेत. प्राथमिक शिक्षक असलेले वामनराव काकडे आणि व्यावसायिक असणाऱ्या सुभद्रा काकडे यांच्या शिस्तबद्ध, संस्कारमय आणि शैक्षणिक संपन्नतेने नटलेल्या कुटुंबात शोभा मोरे यांचा जन्म झाला. कुटुंबाकडून…

ऊर्जावान सदानंद दाते

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी सदानंद दाते यांना नेमण्यात आलेले आहे. आतापर्यंत ते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख होते, ते पद कदाचित या पदापेक्षाही मोठे आहे आणि असेलही परंतु, आपल्या मायभूमीत आपल्या महाराष्ट्रासाठी त्यांच्यासारख्या पोलीस खात्यातील अकलंक अधिकाऱ्याला या पदावर नेमणे नेमण्याचे…

स्त्री पुरुष समानता काळाची गरज

आजची स्त्री ही सक्षम आहे असे म्हणताना हे सक्षमीकरण कितपत गुणात्मक आणि कितपत संख्यात्मक आहे, असा प्रश्न पडतो. याचे उत्तर तिला कितपत आर्थिक, सामाजिक, राजकीय, वैचारिक स्वातंत्र्य मिळते, यात दडले आहे. स्त्री ही मुळातच सक्षम आहे, ती दुर्बल बनली आहे…