टॉप स्टोरी

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कार जाहीर; १५ मार्चला राज्यपालांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

कुणाल लाडे, संदेश साळुंके,शाहिद पठाण, रुपेश बागड,राहुल पवार,स्वप्निल कांबळे, ईश्वर महाजन,महेंद्रसिंग गिरासे,भारत सवणे,विनोद कांबळे,लियाकत पठाण,सारिका शिंदे,संदीप पिंपळकर,महेश जगताप,मल्हारी ओमासे पुरस्काराचे मानकरी मुंबई: पत्रकारांची देशातील सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ च्या वतीने दिले जाणारे…

कोल्हापुरात सतेज पाटलांच्या गडाला खिंडार; मुश्रीफांची ‘पॉवरफुल’ गुगली अन् ‘गोकुळ’च्या रणांगणात मोठा धमाका!

विशेष प्रतिनिधी :राजकीय पेचाचे केंद्र असलेल्या कोल्हापुरात ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीपूर्वीच सत्तेचे सारीपाट उलथवून टाकणारा एक मोठा भूकंप झाला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आमदार सतेज पाटील यांचे खंदे समर्थक आणि जिल्हा बँकेचे मातब्बर संचालक ए. वाय. पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या…

अर्थसंकल्पातील नागपूर जिल्हा

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर विधानपरिषदेत वित्त राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांनी २०२६-२७ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील नागपूर जिल्ह्याशी संबंधित काही महत्वाच्या तरतुदी तसेच वैशिष्टये पुढीलप्रमाणे … – नवरगाव, रामटेक…

*२०४७ च्या विकसित महाराष्ट्राची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प – महसूल मंत्री बावनकुळे*

मुंबई दि. ६ :मुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा केवळ आकडेवारीचा दस्तऐवज नसून वास्तवाची जाणीव ठेवत २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडविण्याचा प्रगतीशील, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली….

‘आज लग्न आणि अपत्य २०४७ मध्ये?’; विधानसभेत कडाडल्या तोफा, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प की कंत्राटदारांची दिवाळी?

मुंबई, विशेष प्रतिनिधी:”हा राज्याचा अर्थसंकल्प आहे की केवळ मुंबई-एमएमआरडीएचा विकास आराखडा?” असा बोचरा सवाल करत विरोधी पक्षाने सरकारच्या ७.६९ लाख कोटींच्या ‘महा-बजेट’वर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्याच्या विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर होत असतानाच, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या…

७.६९ लाख कोटींचा तो आकडा आणि बदलणारे महाराष्ट्र: तुमच्या खिशावर आणि भविष्यावर काय होणार परिणाम?

मुंबई, विशेष प्रतिनिधी:येत्या काळात तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार का? तुमच्या लाडक्या बहिणीला मिळणारी मदत सुरूच राहणार का? आणि राज्याच्या तिजोरीतून तुमच्या जिल्ह्यासाठी नेमके काय पदरात पडले आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे २०२६-२७ च्या महाराष्ट्राच्या अवाढव्य अर्थसंकल्पातून समोर आली आहेत….

देशाचे ‘पॉवरहाऊस’ पुन्हा फॉर्मात; महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गाठणार ५१ लाख कोटींचा टप्पा?

विशेष प्रतिनिधी, मुंबई:महाराष्ट्राची अर्थव्यवस्था केवळ देशातील सर्वात मोठी नसून ती अत्यंत वेगवान गतीने धावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या ‘महाराष्ट्र आर्थिक पाहणी २०२५-२६’ च्या अहवालाने राज्याच्या प्रगतीचे एक आश्वासक चित्र समोर ठेवले आहे. चालू…

अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना लवकरच परत आणले जाईल- मुख्यमंत्री

मुंबई, दि. ४ प्रतिनिधी:इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक आखाती देशांमध्ये अडकले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांना सर्वतोपरी मदत करण्यास राज्य सरकार सज्ज असून, या संदर्भातील जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, अशी माहिती…

मोठी बातमी: दिल्लीच्या रेसमध्ये नागपूरची ‘माया’; दिग्गज नेत्यांना मागे टाकत राष्ट्रपतींच्या निकटवर्तीय महिलेला थेट राज्यसभेची संधी!

विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभेच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या अनेक बड्या चर्चांना पूर्णविराम देत, भारतीय जनता पक्षाने ‘नागपूर कार्ड’ खेळून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. नवनीत राणा किंवा विजया राहटकर यांसारख्या प्रसिद्ध नावांची चर्चा असताना, भाजपने अत्यंत शांतपणे नागपूरच्या माजी महापौर माया…

कमळ फुलणार की धक्का बसणार? भाजपच्या राज्यसभेच्या ‘चौकारात’ दोन दिग्गज अन् दोन गुप्त अस्त्रे!

विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर राज्यसभेच्या रणांगणासाठी भाजपने आपली ‘फिल्डिंग’ लावली असून, जाहीर केलेल्या चार नावांनी राजकीय गणिते पूर्णपणे बदलून टाकली आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम ठेवत भाजपने अशा काही नावांची घोषणा केली आहे, ज्याची साधी कुणकुणही कोणाला लागली नव्हती. केवळ…