मुरबाड

काळू धरण प्रकल्पाला स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांचा तीव्र विरोध

मुरबाड,दि.१३,प्रतिनिधी:मुंबई सारख्या महानगरांची तहान भागवण्यासाठी मुरबाड तालुक्यातील काळू धरण होणार आहे. परंतु येथील स्थानिक रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत काळू धरण विरोधी शेतकरी संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
काळू धरणाचे काम सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला असून काल परवाच याबाबत मंत्रालयामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आमदार, जिल्हाधिकारी, जलसंपदा अधिकारी यांची संयुक्त मीटिंग संपन्न झाली आहे. धरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत सरकारला काही घेणेदेणे नाही. सरकार केवळ प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देत असल्याचे आरोप करण्यात आले. दरम्यान महिला दिनाचे औचित्य साधून चासोळे या ठिकाणी महिला मेळावा संपन्न झाला यावेळी काळू धरण विरोधात महिला एकटवले आहेत.
तानसा, भातसा, वैतरणा या धरणात बाधितांचे प्रश्न अजून सुटले नसून काळू धरण बांधून शासन मोकळे होईल पण विस्थापितांचे काय? असा पवित्रा घेत महिलाही पुरुषांच्या जोडीला उभे राहणार असल्याचे सांगितले.
या मेळाव्याचे आयोजन अरुण राऊत, नंदकुमार राऊत, भरत राऊत, विलास राऊत, विनोद राऊत, शकील शेख, जयवंत थोरात, अनंता राऊत, शिवाजी घोलप, किसन आलम, जगदीश निमसे, बापू देशमुख, यशवंत माधवी, नेताजी ठाकरे, पंढरीनाथ दळवी, मोढवे, अनिल कवटे, गणेश भला, चिंतामण शेंडे, तसेच चासोळे, आंबिवली, शिरसनवाडी, भट्टीची वाडी, तळेगाव, खरशेत, उमरोली, दिघेफळ, खुटल बारागाव, वाकळवाडी, केव्हारवाडी, बांगरवाडी, पेजवाडी, करपटवाडी, आवळ्याचीवाडी, भोरांडे, डोंगरवाडी, आदी गावांच्या महिलांचा समावेश होता.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *