अर्थ टॉप स्टोरी

शेअर बाजारात हाहाकार: सेन्सेक्स ८२९ अंकांनी कोसळला!

मुंबई, दि. १२ प्रतिनिधी गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. या दिवशी सेन्सेक्समध्ये ८२९ अंकांची घसरण झाली, तर निफ्टीमध्ये २२८ अंकांची घट नोंदवली गेली. क्रूड ऑईलची (कच्चे तेल) किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल १०० डॉलरच्या पातळीवर पोहोचल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि त्याचा परिणाम बाजारावर दिसून आला.
सेन्सेक्स: गुरुवारी ७६,३६९ च्या पातळीवर उघडला आणि व्यवहाराच्या अखेरीस १.०८ टक्क्यांच्या घसरणीसह ७६,०३४ वर बंद झाला.

निफ्टी: २३,६७४ च्या स्तरावर उघडला आणि दिवसअखेर ०.९५ टक्क्यांच्या घसरणीसह २३,६३९ वर बंद झाला.या दरम्यान, बीएसई (BSE) वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य मागील सत्रातील सुमारे ४५० लाख कोटी रुपयांवरून घटून ४४० लाख कोटी रुपयांवर आले. यामुळे केवळ एका सत्रात गुंतवणूकदारांना सुमारे १० लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *