टॉप स्टोरी

Top Story-९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते
सातारा येथे सुरु असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ लेखिका, विचारवंत डॉ मृदुला गर्ग यांच्या हस्ते थाटात झाले. मराठी साहित्य हे इतर भारतीय भाषांच्या तुलनेत नेहमीच अग्रेसर राहिले आहे. साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठी क्रांती म्हणजे दलित साहित्याची निर्मिती आहे. भारतीय भाषांमध्ये दलित साहित्य पहिल्यांदा मराठी भाषेतच लिहिल्या गेले. मराठी दलित साहित्यातून इतर भाषिक साहित्यिकांनी दलित लेखनाची प्रेरणा घेत दलित साहित्याची निर्मिती केली असे मत यावेळी त्यांनी मांडले.
………………………………….

नागपुरात भाजप उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडले
भाजपने नागपूरमध्ये एकाच जागेसाठी दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने मोठा असंतोष उसळून आला आहे.. प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजपने किसन गावंडे आणि विजय होले या दोघांना एबी फॉर्म देण्यात आला होता. यापैकी होले यांचा फॉर्म स्वीकृत झाला आहे. गावंडे यांच्यावर उमेदवारी मागे घेण्याबाबत नेते दबाव घालत होते. हे बघून त्यांनी अर्ज मागे घेऊ नये म्हणून त्यांना घरात डांबून ठेवले. यावरून प्रचंड गदारोळ उडाल्यानंतर आमदार परिणय फुके आणि माजी आमदार सुधाकर देशमुख यांच्या माध्यमातून गावंडे यांची कार्यकर्त्यांच्या गराड्यातून सुटका करण्यात आली असून गावंडेंची उमेदवारी मागे घेण्यास भाजपला यश आले आहे .
……………………………………

छत्रपती संभाजी पुस्तकातील चुका सुधारण्याची तयारी, विश्वास पाटील
साताऱ्यातील साहित्य नगरीमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संभाजी या कादंबरीबाबत घेतलेली भूमिका आणि आंदोलनाचा दिलेला इशारा या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. वाद वाढू नये म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मवाळ भूमिका घेत आश्वासन दिले कि आतापर्यंत साडे तीन प्रतींचा खप झाला आहे तरीही या कादंबरीवर काही आक्षेप असेल तर त्यावर चर्चा करू. आणि प्रश्न निकालात काढू.
……………

इंदूरमध्ये दूषित पाणी पिल्यामुळे ७ लोकांचा मृत्यू
मध्य प्रदेशमधील इंदूरमधील भागीरथपूरा भागात दूषित पाणी प्यायल्यामुळे ७ जणांचा मृत्यू तर १०० पेक्षा जास्त जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी माध्यमांना दिली. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी महापौरांनी केली आहे. यानंतर या घटनेची मध्य प्रदेश सरकारने गंभीर दाखल घेत महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
……………

पीएसआय उमेदवार याना पदाच्या भरतित वयोमर्यदेत सवलत दया, विजय वडेट्टिवार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरति प्रक्रियेत वयाच्य मर्यादेमुळे हजारो तरुण तरुणी अपात्र ठरत आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन देखील केले आहे. या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

तिकीट वाटपावरून सोलापूरमध्ये मनसे नेत्यावर जीवघेणा हल्ला
सोलापूरमधील जोशी गल्लीमध्ये भाजपच्या दोन गटांमध्ये तिकीट वाटपावरून वाद विकोपाला जात मध्यस्थी करणाऱ्या मनसे नेत्याची हत्या करण्यात अली आहे. यातील एका गटातील कार्यकर्त्याला तिकीट मिळाल्यानंतर दुसऱ्या गटाने कार्यकर्त्याच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. समाजात तणाव नको म्हणून मनसे नेते बाळासाहेब सरवदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला.

ठाकरेंचा मुंबईकरांसाठी अधिकृत वचननामा
मुंबई महानगरपालिकेत सत्ता आल्यास मुंबईच्या विकासासाठी नेमके काय करायचे याबाबत अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी संयुक्तपणे महानगरपालिका उमेदवारांसमोर एक महत्वाचे प्रेसेंटेशन सादर केले. हे प्रेझेंटेशन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी जाईल. व त्यात आवश्यक ती सुधारणा करण्यात येईल. या वचननाम्यात महापालिकेच्या मालकीची जमीन खासगी विकासकांच्या घशात न घालता मुंबईकरांची सोय, बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांना हक्काची घरे इत्यादी आश्वासने आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी दिली आहेत.
………….

अर्ज भरू न देण्यावरून राहुल नार्वेकर वादाच्या भोवऱ्यात
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत मोठा वाद निर्माण झाला आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कुलाबा परिसरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजकीय उमेदवारांना धमकावून अर्ज भरू दिले नाही. असा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच बीएसपी नेते हरिभाऊ राठोड आणि राहुल नार्वेकर यांच्यात देखील वाद झाल्याचा विडिओ व्हायरल झाला आहे.
………

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *