उल्हासनगर

फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकणा-यावर मुख्याध्यापिकेवर कारवाई करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी

उल्हासनगर , दि . १३ प्रतिनिधी : उल्हासनगरमध्ये काही दिवसांपासून आर टी ई ( RTE ) अंतर्गत शाळा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दबाव टाकत असल्याने विद्यार्थी व पालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या बेकायदेशीर फी वसुली करणा-या मुख्याध्यापिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर पुर्व विभागाचे अध्यक्ष अँड.उज्वल महाले यांनी उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी दिपक धनगर यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

उल्हासनगर कॅंप एक या ठिकाणी आर.जे.स्कूल आहे. या स्कुल मधील मुख्याध्यापिकेकडुन विद्यार्थ्यांंच्या पालकाकडे फी भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. यामुळे विद्यार्थी व त्यांचे पालक कमालीचे त्रस झाले आहेत.काही पालकांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड.उज्वल महाले यांच्याकडे धाव घेतली होती.काल अँड.उज्वल महाले, सिध्दार्थ सुरडकर ,दत्ता जाधव या शिष्टमंडळाने प्रशासन अधिकारी दिपक धनगर याची प्रत्यक्ष भेट घेऊन बेकायदेशीर फी वसुल करणा-या शाळेच्या मुख्याध्यापिकेवर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *