नाशिक । इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात ‘आयएमए’च्यावतीने २१ व २२ फेब्रुवारी रोजी आय एम ए हॉल शालिमार येथे ‘रिफ्रेशकॉन-२०२६’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन रवीवारी (दि.२२) महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. या परिषदेत डॉ. वसंतराव गुप्ते वक्तृत्व सत्रात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत पुरंदरे ‘वैद्यकीय व्यवहारात बदलणारी परिस्थिती’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर डॉ. आप्पासाहेब पवार वक्तृत्व सत्रात स्त्रीरोगतज्ज्ञ तथा वैद्यकीय कायदा तज्ज्ञ डॉ. मनीष माचवे ‘द बुल्स आय’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय दोन्ही दिवशी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. आयएमए सदस्यांनी या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष डॉ. निलेश निकम, सचिव डॉ. मनीषा जगताप, खजिनदार डॉ. अनिता भामरे, निमंत्रक डॉ. प्रेरणा शिंदे, सह-निमंत्रक डॉ. शलाका बागुल, समन्वयक डॉ. पंकज भट, सह-समन्वयक डॉ. निलेश जेजुरकर आदींनी केले आहे.




