उल्हासनगर , दि . ३ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेच्या महापौर पदावर अश्विनी निकम तर उपमहापौर पदावर अमर लुंड यांची बिनविरोध निवड झाली असुन आज त्यांच्या नावावर महासभेत शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेना भाजपा युती झाल्याने या दोन्ही पदाकरिता विरोधी नामांकन अर्ज नसल्याने ही निवड बिनविरोध झाली आहे.उल्हासनगर महापालिका आयुक्त सौ . मनिषा आव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित महासभेत पिठासीन अधिकारी मनुज जिंदल यांनी महापौर व उपमहापौर पदावर निकम व लुंड यांची निवड झाल्याची घोषणा केली.
उल्हासनगर महापालिकेची निवडणुक शिवसेना व भाजपा यांनी एकमेकाविरुध्द लढवली होती. युती होणार नाही अशा संभ्रमात राहुन दोन्ही पक्षानी जोरदार टक्कर देत निवडणुक लढवली असुन भाजपाने ३७ जागावर विजय मिळवला तर शिवसेनेने ३६ जागावर विजय प्राप्त केला. ही निवडणुक ७८ जागासाठी झाली आहे. तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक निवडुन आले असुन कॉंग्रेस एका जागेवर तर अपक्ष एका जागेवर निवडणुक जिंकल्याने सत्तेचे समीकरण बिघडले होते. मात्र शिवसेनेने वंचित व अपक्ष यांना सोबत घेवुन कोकण विभागीय आयुक्ताकडे गट नोंदणी केला.
दरम्यान शिवसेनेचाच महापौर होणार अशी चर्चा जोरदार सुरु असतानाच ३० जानेवारी रोजी भाजपा व शिवसेना यांनी युती करत महापौर पदावर शिवसेनेच्या अश्विनी निकम तर व उपमहापौर पदासाठी भाजपाचे अमर लुंड यांचा एकत्र नामांकन अर्ज दाखल केला . दरम्यान विरोधी कोणाचा ही अलग अर्ज दाखल झाला नसल्याने त्याच दिवशी महापौर व उपमहापौर पदाची निवडणुक बिनविरोध झाली . मात्र आज उल्हासनगर महापालिकेच्या सभागृहात महासभेचे आयोजन करत या दोन्ही पदावर शिक्का मोर्तब केले आहे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व पिठासीन अधिकारी मनुज जिंदल यांनी महासभेची प्रक्रिया राबवत महापौर पदावर अश्विनी कमलेश निकम व उपमहापौर पदावर अमर लुंड यांची निवड झाल्याची घोषणा केली. आता गेल्या चार वर्षापासुन महापालिकेवर असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असुन लोकशाहीचे नवे पर्व सुरु झाले आहे. मात्र शिवसेना भाजपाची झाली युती, सत्तेमुळे करु नये अति , नाहीतर येथील नागरिक चारतील माती हे लक्षात ठेवुन सत्ता चालवुन शहराचा विकास करावा अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. दरम्यान प्रथम सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रध्दांजली वाहन्यात आली . माजी आमदार पप्पु कलानी यांनी सभागृहात जावुन महापौर उपमहापौर यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत .तर ही निवडणुक अत्यंत शांततेत पार पडली आहे .




