बदलापूर

बदलापूरच्या ऐतिहासिक चंदेरी गडावर गिर्यारोहकाचा दुर्दैवी मृत्यू

बदलापूर, दि ५,प्रतिनिधी:बदलापूर जवळ ऐतिहासिक चंदेरी गडावर गिर्यारोहणासाठी आलेल्या एकाचा गडावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेनंतर सुरू असलेले शोधकार्य तब्बल २४ तासांनंतर यशस्वी झाले असून स्थानिक रेस्क्यू टीमने मृतदेह सुरक्षितपणे खाली आणला. या घटनेमुळे ट्रेकिंग समुदायात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित गिर्यारोहक चंदेरी गडावर आला होता दरम्यान गडावरून तोल जाऊन खाली पडल्याने हा अपघात घडला. घटनेनंतर त्याचा संपर्क तुटल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला.

मात्र, गडाचा दुर्गम आणि अवघड परिसर असल्यामुळे शोधकार्य करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.तब्बल चोवीस तासांच्या अथक मेहनतीने स्थानिक रेस्क्यू टीमच्या मदतीने गिर्यारोहकाचा मृतदेह आढळून आला. प्रतिकूल हवामान आणि कठीण भौगोलिक परिस्थितीतही रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी अत्यंत कौशल्याने मृतदेह गडाखाली सुरक्षितपणे आणण्याचे काम पार पाडले.या दुर्दैवी घटनेनंतर ट्रेकिंग करताना आवश्यक ती खबरदारी, सुरक्षिततेची साधने आणि योग्य मार्गदर्शन घेण्याचे आवाहन गिर्यारोहक संघटनांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *