ग्रामीण महाराष्ट्रात ‘कमळ’ जोरात, मविआचा सुपडा साफ !
विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना ‘आरसा’, काय म्हणाले नेत्यांबद्दल? मुंबई, विशेष प्रतिनिधी:”राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निकालांनी महायुतीच्या बाजूने दिलेला कौल म्हणजे विकासाच्या राजकारणाचा विजय आहे. भाजपने स्वतःचा २०१७ चा रेकॉर्ड मोडीत काढला असून ग्रामीण जनतेने विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाला मतपेटीतून चोख उत्तर…
शासकीय रुग्णालयांत आता पैसे भरावे लागणार? आरोग्य विभागाच्या ‘त्या’ निर्णयामुळे पसरलेली भीती खरी की खोटी?
मुंबई, विशेष प्रतिनिधी:राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी आता खिसा रिकामा करावा लागणार, अशा चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाने यावर अधिकृत स्पष्टीकरण देऊन नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. शासकीय रुग्णालयांमधील तपासणी आणि उपचार पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे…
मिनी मंत्रालयात काँग्रेसचाच जोर? दोन जिल्हा परिषदांवर कब्जा मिळवत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला कसे डिवचले?
मुंबई विशेष प्रतिनिधी :”राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या विचारांचा आणि संघटनेचा विस्तार करण्यासाठी स्वबळाचा नारा दिला होता आणि आजच्या निकालांनी जनतेने काँग्रेसच्या विचारांनाच कौल दिला आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी केले….
प्रस्थापितांच्या लाटेत वंचितची ‘एक्झिट’ की एमआयएमचा ‘गेम ओव्हर’? मिनी मंत्रालयाच्या निकालात छोटे पक्ष का ठरले भुईसपाट?
विशेष प्रतिनिधी:राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी प्रस्थापित राजकीय समीकरणांवर शिक्कामोर्तब केले असून, ‘किंगमेकर’ ठरू पाहणाऱ्या वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या पक्षांना मतदारांनी जोरदार झटका दिला आहे. महापालिका निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावणाऱ्या या पक्षांचा ग्रामीण भागात…
रायगडचा ‘किंग’ कोण? तटकरेंच्या बालेकिल्ल्यात गोगावलेंनी मारली बाजी की दोघांत झाला सत्तेचा समतोल?
विशेष प्रतिनिधी:कोकणच्या राजकीय पटलावर सत्तेचा सारीपाट मांडला गेल्यावर रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांनी सर्वांनाच चकित केले आहे. ही निवडणूक म्हणजे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यातील अस्तित्वाची लढाई होती. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत…
अजितदादांच्या वारशावरून राष्ट्रवादीत यादवी? तटकरे-पटेल यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, विलीनीकरणाच्या हालचालींनी महायुतीतही अस्वस्थता!
मुंबई, विशेष प्रतिनिधी:राष्ट्रवादी काँग्रेसचे खंबीर नेतृत्व अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या राजकीय भविष्याबाबतचा सस्पेन्स अधिकच गडद झाला आहे. दोन्ही राष्ट्रवादींचे पुनर्मिलन होणार की अजितदादांचा गट थेट भाजपमध्ये विलीन होणार, या प्रश्नावरून राजकीय धुरळा उडाला आहे. विलीनीकरणाच्या चर्चांना सुनील तटकरे यांनी…
सांगलीच्या ग्रामीण सत्तेची चावी कुणाकडे? पाहा, कुणी राखला बालेकिल्ला आणि कुठे झाले सत्तांतर!
विशेष प्रतिनिधी:सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले असून जिल्ह्याच्या ‘मिनी मंत्रालयाचे’ राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत काही तालुक्यांत सत्ताधारी महायुतीने आपले वर्चस्व राखले आहे, तर काही ठिकाणी महाविकास आघाडीने मुसंडी मारत प्रस्थापितांना जोरदार…
कुटुंबातच सत्तेचा पेच: मंत्री जयकुमार गोरेंच्या बालेकिल्ल्यात बंधूचा पराभव, पण वहिनीचा विजय कसा ठरला चर्चेचा?
विशेष प्रतिनिधी:राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, मंत्री जयकुमार गोरे यांच्या कुटुंबातच विजयाचा आणि पराभवाचा विचित्र संगम पाहायला मिळाला आहे. आपल्या बंधू आणि वहिनीला निवडून आणण्यासाठी जयकुमार गोरे यांनी माण तालुक्यात…
सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यांना भगदाड, मतदारांचा घराणेशाहीला स्पष्ट नकार
विशेष प्रतिनिधी:सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. प्रस्थापित नेत्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना घरी धाडून मतदारांनी विकासाला आणि नव्या चेहऱ्यांना पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः मंत्री मकरंद पाटील यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात…
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती चिंताजनक; बारामतीहून तातडीने पुण्यातील रुग्णालयात हलवले
विशेष प्रतिनिधी:राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ८५ वर्षीय पवार हे बारामतीतील त्यांच्या निवासस्थानी असताना त्यांना तीव्र अस्वस्थता जाणवू लागली. त्यांच्या वाढत्या वयाचा विचार करून स्थानिक डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुण्यातील…










