खासगी शाळांना टक्कर देणार पालिकेचा ‘स्मार्ट’ पॅटर्न! ४,२४८ कोटींच्या बजेटमध्ये डिजिटल वर्ग अन् विद्यार्थ्यांसाठी ‘जादुई पिटारा’
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आता कात टाकणार असून, विद्यार्थ्यांच्या हाती टॅब आणि वर्गांमध्ये डिजिटल बोर्ड दिसणार आहेत. आगामी २०२६-२७ आर्थिक वर्षासाठी शिक्षण विभागाने ४,२४८.०८ कोटी रुपयांचा भव्य अर्थसंकल्प सादर केला आहे. पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सादर झालेल्या या…
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेत्यांची हायहोल्टेज ड्रामा अन् पोलिसांशी जोरदार खडाजंगी; ‘अजितदादांना न्याय मिळेना, तर सामान्यांचं काय?’
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे प्रकरण आता पूर्णपणे पेटले असून, मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आज आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. “राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मृत्यू होतो आणि पुरावे…
‘त्या’ विमान अपघातामागे काळंंबेरं? रोहित पवारांचा थेट मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धडक; DGCA विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी!
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे प्रकरण आता केवळ चौकशीपुरते मर्यादित न राहता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी आज मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धाव घेत, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या नागरी विमान…
आभाळच फाटलं! पांढऱ्या गारपिटीने हिरवं शिवार झालं बर्फाच्छादित; अवकाळीचा तडाखा अन् विदर्भासह मराठवाड्याला पुन्हा ‘येलो अलर्ट’
मुंबई: महाराष्ट्राच्या नशिबी असलेला अवकाळीचा फेरा संपता संपेनासा झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका पुन्हा एकदा बळीराजाला बसला असून, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने अक्षरशः तांडव घातले आहे. गारपिटीमुळे पिके पांढऱ्या चादरीखाली गाडली गेली असून, हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी राज्याच्या…
एकाच नंबरवर पाच बसेस अन् थेट सीमेवरून घुसखोरी? महाराष्ट्रात येणाऱ्या त्या खासगी ट्रॅव्हल्सचे ‘बांगलादेश कनेक्शन’ चव्हाट्यावर!
मुंबई, विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या सुरक्षेला भगदाड पाडणारा एक अत्यंत धक्कादायक खुलासा विधानसभेत झाला असून, बांगलादेशच्या सीमेपर्यंत धावणाऱ्या खासगी बसेसमधून घुसखोरांची थेट एन्ट्री होत असल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे. या आरोपाने विधिमंडळात एकच खळबळ उडाली असून, आरटीओ…
दिल्लीच्या दरबारी कुणाची लागणार वर्णी? भाजपच्या यादीत ‘हे’ दिग्गज; तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांबाबत मोठा निर्णय!
मुंबई, विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज्यसभेच्या रणांगणाची जोरदार तयारी सुरू असून, महायुतीमधील जागांचे समीकरण आता जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप कोअर कमिटीच्या १२ प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या खलबतांमध्ये उमेदवारांच्या नावांची यादी तयार करण्यात आली आहे. या…
मोठ्या रुग्णालयांच्या ‘फ्री’ खाटांवर आता गरिबांचाच हक्क; करसवलती घेणाऱ्या रुग्णालयांची मनमानी रोखण्यासाठी सरकारचा मास्टर प्लॅन!
मुंबई: चकाचक इमारती आणि हाय-टेक सुविधा असलेल्या राज्यातील धर्मदाय रुग्णालयांचे दरवाजे आता खऱ्या अर्थाने गोरगरिबांसाठी उघडणार आहेत. “ज्यांनी शासनाच्या सवलती घेतल्या, त्यांना गरिबांना मोफत उपचार द्यावेच लागतील,” अशा शब्दांत मंत्री आशिष जयस्वाल यांनी आज सभागृहात रुग्णालयांना इशारा दिला. पारदर्शकता आणण्यासाठी…
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आज शेगाव येथे करणार राष्ट्रीय आरोग्य मेळावा-2026 चे उद्घाटन
बुलढाणा, दि. 24(जिमाका) : भारत सरकारचे आयुष मंत्रालय, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे चार दिवसांचा “राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026” आयोजित करण्यात आला आहे. औषधी वनस्पती लागवड आणि…
अवकाळीच्या तडाख्याने बळीराजा कोलमडला! मुंडेंच्या आक्रमकतेपुढे सरकार नमले; बांधावर पंचनाम्याचे आदेश
विशेष प्रतिनिधी,मुंबई: निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, आमदार धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रशासकीय यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. राज्यात काल झालेल्या वादळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे रब्बी पिकांचे जे नुकसान झाले आहे, त्याचे तातडीने पंचनामे…
समृद्धीवर सुविधांची वानवा अन् पुतळ्याची फक्त घोषणाच; उपसभापतींनी प्रशासनाला सुनावले खडे बोल, आता द्यावे लागणार व्हिडिओ पुरावे!
मुंबई, विशेष प्रतिनिधी:हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा समृद्धी महामार्गावरील प्रस्तावित पुतळा आणि प्रवाशांसाठीच्या सुविधांच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत आज प्रशासनाची मोठी कोंडी झाली. “केवळ फाईलींवर उत्तरं देऊ नका, तर महामार्गावर नेमकं काय सुरू आहे याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगच सभागृहात सादर करा,” अशा कडक…










