विक्रोळीत टागोर नगर येथील प्रभाग क्रमांक ११९ मध्ये बोगस मतदान सत्य आले समोर
विक्रोळीतील टागोर नगर येथील प्रभाग क्रमांक ११९ मधील सिद्धीविनायगर शाळेतील मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजेश शुक्ला हे दुपारी १२ वाजता मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्या नावावर सकाळीच मतदान झाल्याचे उघडकीस आले. ही बाब त्यांनी निवडणूक…
मतदान की अग्निपरीक्षा?बूथ शोधत भटकणारा मुंबईकर, यंत्रणांची कोंडी आणि राजकीय आरोपांच्या फैरी!
विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानदिनी लोकशाहीचा उत्सव रंगेल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात अनेक मतदारांसाठी हा दिवस भटकंती, गोंधळ आणि संतापाचा ठरत असल्याचे चित्र शहरभर दिसून येत आहे. सकाळपासूनच मुंबईतील विविध भागांत मतदार “माझं मतदान कुठे आहे?” या एका…
सिंचन घोटाळा वरून अजित पवारांचा भाजपवर निशाणा
1999 मध्ये भाजप शिवसेना युतीच्या काळात पुरंदर उपसा सिंचन प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपया वरून 310 कोटी पर्यंत नेण्याचा आरोप अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. एकनाथ खडसे यांनी पलटवार केला आहे की एवढी वर्ष हा भ्रष्टाचार तुम्ही का लपवून…
चांदवड- मनमाड महामार्गावर भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू
चांदवड शहरातील चांदवड- मनमाड राज्य महामार्गावर भीषण स्वरूपाचा विचित्र अपघात झाला. चांदवड मनमाड महामार्गावर सकाळी अकराच्या सुमारास मनमाडहून चांदवडच्या दिशेने सिमेंटच्या विटा भरलेला ट्रक भरधाव वेगाने येत होता. शहरातील कोतवाल वस्ती, मनमाड रोडवर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अचानक ट्रक पलटी…
मतदारांना भेटण्याची मुभा का? राज ठाकरे यांचा सवाल
मंगळवारी संध्याकाळी पाच नंतर प्रचार थांबल्यानंतरही उमेदवारांना मतदारांना घरोघरी जाऊन भेटण्याच्या निवडणूक आयोगाच्या मुभेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप नोंदवला आहे. प्रचार थांबल्यानंतरही उमेदवारांना मतदारांना भेटू देण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला आरोपाच्या…
नागपूरमध्ये पैसे वाटपावरून भाजप काँग्रेसमध्ये राडा
नागपुरात भाजपच्या उमेदवार प्रगती अजय पाटील यांच्या प्रचारासाठी काही कार्यकर्त्यांनी मतदारांना रोख रक्कम व साहित्य वाटप केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता उल्लंघनाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. भाजपचे कार्यकर्ते विवेक सिंग, मानस माळी आणि अन्य दोन…
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार अडचणीतच
राज्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे 67 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तरीसुद्धा निवडून आलेल्या उमेदवारांची चौकशी करण्याचे आदेश राज्य…
सौहार्दपूर्ण महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी
राज्यातील 29 महापालिकांसाठी आज सकाळी 7.30 वाजतापासून मतदान होत असून 2869 नगरसेवक रिंगणात आहेत. हे मतदान सौहार्द पूर्ण, शांततामय आणि भयविरहित वातावरणात होण्यासाठी राज्याचे प्रशासन जय्यत तयारीत आहेत. मतदान सुनियोजित पद्धतीने व्हावे यासाठी मतदारांपर्यंत मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण पूर्णपणे करण्यात…
‘वंदे भारत’ मध्ये गुजराती भाषेला मानाचे पान ; मायमराठी चौथ्या क्रमांकावर ; मुंबईकर प्रवासी संतप्त
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : एका बाजूला मराठी माणूस एकवटला असतांनाच मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे षडयंत्र रेल्वे कडून होत असल्याचे दिसून येते. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राम नाईक हे रेल्वे राज्यमंत्री असतांना राज्यात राज्यभाषा, मग राष्ट्रभाषा हिंदी (जी अधिकृत…
बिनविरोध निवडींना स्थगिती नाही: मनसे नेते अविनाश जाधव यांची याचिका फेटाळली; ६७ उमेदवारांना दिलासा
विशेष प्रतिनिधी मुंबई:महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडींवरून निर्माण झालेल्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (१४ जानेवारी) महत्त्वाचा निर्णय दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते Avinash Jadhav यांनी दाखल केलेली बिनविरोध निवडींना स्थगिती देण्याची मागणी करणारी रिट याचिका न्यायालयाने फेटाळली. या…










