शर्टाचं वरचं बटन आता कधीच लावणार नाही…’; काकांच्या आठवणीने रोहित पवार विधानसभेत ढसाढसा रडले
मुंबई, विशेष प्रतिनिधी :”अजितकाका नेहमी मला सांगायचे, रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्यात त्या कमी कर आणि शर्टाचं वरचं बटन नेहमी लावत जा… पण आता हे सांगायला काका उरले नाहीत. त्यांची आठवण म्हणून मी आता शर्टाचं ते बटन कधीच लावणार नाही,” अशा…
‘आयुष्यभर टायमिंग पाळणाऱ्या दादांनी चक्क मृत्यूचं टायमिंग चुकवलं’; फडणवीसांच्या भाषणाने विधानसभेचे डोळे पाणावले
मुंबई, विशेष प्रतिनिधी :”अजितदादा म्हणजे केवळ राजकीय सहकारी नव्हते, तर ते अंतःकरणातून प्रेम करणारे माझे जिवलग मित्र होते. आयुष्यभर वेळेचे काटेकोर पालन करणाऱ्या दादांनी आयुष्याच्या अंतिम क्षणी मात्र पहिल्यांदाच टायमिंग चुकवले. मुख्यमंत्रीपदाची पूर्ण क्षमता असणारे अजितदादा हे महाराष्ट्राला कधीही न…
‘दादांचा निरोप घेणं हा काळाचा क्रूर थट्टा आहे’; विधानसभेत भुजबळांनी उलगडला ४० वर्षांच्या मैत्रीचा प्रवास
मुंबई, विशेष प्रतिनिधी :”ज्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून अनेक राजकीय लढाया लढल्या, त्याच अजितदादांसाठी आज शोकप्रस्ताव मांडावा लागत आहे, हे पाहून मन सुन्न झाले आहे,” अशा शब्दांत राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत आपल्या भावना व्यक्त केल्या. १९८५ पासूनचा प्रदीर्घ…
आरक्षणाचा ‘ब्रेक’ आणि निवडणुकांना ‘स्टे’; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने २२ जिल्ह्यांचा निवडणूक मार्ग रोखला!
मुंबई, विशेष प्रतिनिधी :राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची प्रतीक्षा करणाऱ्या राजकीय वर्तुळाला आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. “जोपर्यंत आरक्षणाचा गुंता सुटत नाही, तोपर्यंत निवडणुका घेणे व्यवहार्य नाही,” अशी कडक टिप्पणी करत न्यायालयाने राज्य सरकारची प्रलंबित निवडणुका…
दरेकरांच्या गाडीत शशिकांत शिंदे; ‘त्या’ एका प्रवासामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात संशयाचा धूर!
मुंबई, विशेष प्रतिनिधी :राज्याच्या राजकारणात शत्रू आणि मित्र यांच्यातील रेषा किती धूसर असते, याचा प्रत्यय आज विधान भवनाच्या परिसरात पुन्हा एकदा आला. भाजपचे संकटमोचक आमदार प्रविण दरेकर आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या दोन टोकाच्या विचारधारेच्या नेत्यांनी चक्क…
‘दादा, तुमचा हा एकच निर्णय चुकला…’; विधान परिषदेत एकनाथ शिंदेंनी उलगडला मैत्रीचा हळवा कोपरा
मुंबई, विशेष प्रतिनिधी:”अजितदादा, तुम्ही आयुष्यात घेतलेले अनेक राजकीय निर्णय काळाने योग्य ठरवले, पण जगाचा निरोप घेण्याचा हा निर्णय मात्र पूर्णपणे चुकला आहे. तो निर्णय मागे घ्या आणि परत या…” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनातील आर्त साद विधान…
शिंदेंचा ‘विश्राम’ की वादळापूर्वीची शांतता? अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्व खाती सोपवली दुसऱ्यांकडे!
मुंबई, विशेष प्रतिनिधी:राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक अत्यंत अनपेक्षित पाऊल उचलल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अधिवेशन काळापुरती आपल्या ताब्यातील सर्व महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी शिंदेंनी आपल्या सहकारी मंत्र्यांकडे सोपवली असून, तसे अधिकृत पत्रच त्यांनी…
शिंदेंच्या ‘कॅबिनेट’ स्वप्नाला लालफितीचा ब्रेक? हजारो ज्येष्ठांची तीर्थयात्रा आता अधांतरी!
मुंबई, विशेष प्रतिनिधी :राज्यातील कानाकोपऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शनाचे स्वप्न दाखवणारी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ आता सरकारी फाइल्समध्ये अडकली की काय, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी अत्यंत महत्त्वाकांक्षी स्वरूपात सुरू केलेल्या या योजनेला आता अचानक…
अजित पवारांच्या निधनाचे गूढ वाढले; रोहित पवारांचा ‘त्या’ रिपोर्टवरून यंत्रणांना थेट इशारा!
मुंबई, विशेष प्रतिनिधी :”अजित पवार यांच्या अपघाती निधनाचा तपास जर थातूरमातूर केला, तर मराठी माणूस काय असतो हे तपास यंत्रणांना दाखवून द्यावे लागेल,” अशा कडक शब्दांत आमदार रोहित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर उपस्थित…
महापालिकेत शिंदेंची ‘पॉवर प्ले’; दोन खास शिलेदारांची वर्णी लावत विरोधकांना दिले तगडे आव्हान!
मुंबई, विशेष प्रतिनिधी :मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता चाणाक्ष खेळी खेळली आहे. महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून दोन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, यामध्ये अनुभवाची शिदोरी आणि युवा जोम यांचा अचूक संगम साधण्यात…










