#MaharashtraPolitics

स्वबळावर सत्ता तरीही ताणतणाव: नाशिकमध्ये भाजप पुढे, मुंबईत शिंदे गटाचं वजन वाढलं

विशेष प्रतिनिधी | नाशिक:महापालिका राजकारणात विजय आणि अडचण यांचा विचित्र संगम सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. नाशिक महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवूनही भाजप पूर्णतः निर्धास्त नाही, तर मुंबईच्या महापौरपदाच्या गणितामुळे शिंदे गटाचं राजकीय वजन अचानक वाढल्याचं चित्र आहे. या दोन टोकांच्या…

दिल्लीच्या दालनात पुन्हा थांबा… ‘त्या’ निर्णयाची तारीख ठरली, महाराष्ट्राचं लक्ष आता एका दिवसाकडे

विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली:शिवसेनेच्या सत्तासंघर्षावर पडलेले अनिश्चिततेचे सावट आजही कायम आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाच्या वादात आज निर्णायक घडामोड होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतरही निकाल लागला नाही. परिणामी, महाराष्ट्राच्या राजकारणात…

शिवसेनेच्या सत्तासंघर्षावर अनिश्चिततेचे सावट; धनुष्यबाणावरील निकाल पुन्हा लांबण्याची शक्यता

विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली:शिवसेनेतील फाटाफुटीनंतर सुरू झालेल्या सत्तासंघर्षाचा निर्णायक टप्पा मानल्या जाणाऱ्या धनुष्यबाण चिन्हावरील वादाचा निकाल पुन्हा एकदा लांबण्याची चिन्हे आहेत. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याकडे महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असतानाच, सुनावणीबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे अनिश्चितता…

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्ट्रॅटेजी

आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे काका_ पुतणे, शरद पवार आणि अजित पवार यांनी आखलेल्या स्ट्रॅटेजीनुसार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कडून लढणाऱ्या उमेदवाराकडून घड्याळ आणि तुतारी वाजविणारा…

मुंबई महानगरपालिका महापौर पदावर शिवसेनेचा दावा, एकनाथ शिंदे

जानेवारीपासून शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात होत आहे. यानिमित्ताने मुंबई महानगरपालिका महापौर पदावर शिवसेनेचा नगरसेवक असावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याने मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेच्या दाव्याचे संकेत दिले आहे. पण यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट…

सुधीर मुनगंटीवार आणि विजय वडेट्टीवार आमने सामने

चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भाजपसोबत राहूनच विकास साधला जाऊ शकतो असे वाटत असल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांचा एक गट आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या…

काशीत बुलडोझर, महाराष्ट्रात संताप!

अहिल्याबाई होळकर व धनगर समाजाचा अपमान; ‘हे कसले हिंदुत्व?’ — नाना पटोलेंचा मोदी–योगींवर घणाघात विशेष प्रतिनिधी:“हिंदुत्वाचे रक्षक असल्याचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनीच हिंदू अस्मितेवर घाव घातला आहे,” अशा शब्दांत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे…

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त संयुक्त कार्यक्रम

विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिकेच्या निवडणुकांनंतर राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये आता एक महत्त्वाचा अध्याय जोडला जाणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. महापालिका निकालानंतर पहिल्यांदाच ठाकरे…

आरक्षणाची चिठ्ठी की राजकीय चक्रव्यूह?मुंबई महापौरपदावर सत्ता असूनही महायुती अडचणीत; ठाकरेंच्या खेळीला नवे बळ

विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापौरपदाची निवड आता फक्त निवडणुकीनंतरची औपचारिक बाब राहिलेली नाही. आरक्षणाच्या सोडतीने सत्तेची दिशा बदलण्याची वेळ आली आहे. गुरुवारी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी ११ वाजता २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत होणार असून, या एका प्रक्रियेवर…

मुंबईचा महापौर ‘दिल्ली ठरवणार’! भाजपची ठाम भूमिका; युतीतील सामंजस्य राखत फडणवीसांची तारेवरची कसरत

विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाचा पेच आता शहराच्या चौकटीबाहेर जाऊन थेट राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. “मुंबईत महापौर भाजपचाच”—अशी ठाम भूमिका भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने घेतल्याचे संकेत मिळत असून, हा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून समजते. त्यामुळे महायुतीतील…