मुंबई महापालिकेत पहिल्याच दिवशी ‘महाभारत’; मोदींच्या घोषणांना ‘चोर है’ने उत्तर, ठाकरे आणि भाजप आमनेसामने का?
विशेष प्रतिनिधी, मुंबई:मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा सोपान चढताना भाजप-शिवसेना महायुतीने दणक्यात सुरुवात केली खरी, पण याच सोहळ्याला राजकीय संघर्षाचे ग्रहण लागले. प्रशासकीय राजवट संपवून लोकशाहीचे पाऊल पालिकेत पडत असतानाच, भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे ठाकले….
अमरावतीत माणुसकीला काळिमा; पाच नराधमांनी शाळकरी मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले, आता तरी न्याय मिळणार का?
विशेष प्रतिनिधी:अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय निष्पाप शाळकरी मुलीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून, या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या…
खडसेंची ‘ती’ अडचण २४ फेब्रुवारीपर्यंत टळली? भोसरी प्रकरणाला उच्च न्यायालयातून अचानक ‘ब्रेक’; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!
विशेष प्रतिनिधी:राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात अडकलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत दिलासादायक ठरला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयात सुरू असलेल्या आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला २४ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. यामुळे १३ तारखेला…
राज्याच्या तिजोरीची चावी ‘या’ दिवशी उघडणार? २३ फेब्रुवारीपासून विधिमंडळाचे वादळी अधिवेशन; महिला शेतकऱ्यांसाठी होणार मोठा निर्णय?
विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक आज निश्चित करण्यात आले असून, सोमवार २३ फेब्रुवारी २०२६ पासून मुंबईत सत्तेचा आणि संघर्षाचा नवा अंक सुरू होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्च २०२६ रोजी…
राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; राज ठाकरेंनाही लगावला सणसणीत टोला!
विशेष प्रतिनिधी:”पक्षाचे विलिनीकरण करणे किंवा न करणे, हा सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. जेव्हा वेळ येईल आणि ते आम्हाला विचारतील, तेव्हाच मी त्यावर भाष्य करेन. आत्ताच कशाला हवेत पतंग उडवता?” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा बेमुदत संपाचा इशारा , उद्या “राज्यभर धरणे सत्याग्रह”
मुंबई दि. १० प्रतिनिधीदेशातील ११ प्रधान संघटना व अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार, देशातील ५ कोटी कामगार-कर्मचाऱ्यांनी, प्रलंबित मागण्यांच्या आग्रहासाठी, येत्या दि. १२ फेब्रुवारी रोजी संपावर जाण्याचा निर्धार केला आहे. चार कामगार संहिता रद्द करा, पीएफआरडीए कायदा रद्द…
प्रवासातील महिलांची सुरक्षा केवळ ‘कागदावरच’? नीलम गोऱ्हेंनी उघड केल्या ‘सेफ्टी ऑडिट’मधील त्रुटी; पॅनिक बटण ठरले शोभेची वस्तू!
विशेष प्रतिनिधी:राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महिलांसाठी खरोखरच सुरक्षित आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेने राबवलेल्या राज्यव्यापी ‘सेफ्टी ऑडिट’मधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तपासणीत, प्रवासादरम्यान महिलांना…
अजितदादांच्या मृत्यूचं ‘गुपित’ मंत्रालयातील ‘त्या’ फाईलमध्ये? रोहित पवारांनी समोर आणला विदर्भातील बड्या नेत्याचा संशयास्पद घटनाक्रम!
विशेष प्रतिनिधी:अजित पवार यांच्या विमान अपघाताचे प्रकरण आता केवळ तांत्रिक बिघाडापुरते मर्यादित राहिले नसून, त्याला एका मोठ्या राजकीय षडयंत्राचे स्वरूप प्राप्त होताना दिसत आहे. आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात खळबळजनक गौप्यस्फोट करत, हा साधा अपघात नसून एक सुनियोजित ‘घातपात’ असल्याचा…
भाजप आणि एमआयएममध्ये ‘छुपी युती’? काँग्रेसच्या पराभवानंतर सपकाळ यांनी नक्की कोणावर डागली तोफ?
विशेष प्रतिनिधी:चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत काँग्रेसला बसलेल्या धक्क्याने महाविकास आघाडीतील खदखद चव्हाट्यावर आली आहे. “अंजनगाव सुर्जी, अकोट आणि अचलपूरप्रमाणेच आता चंद्रपुरातही भाजप आणि एमआयएमची ‘अदृश्य युती’ उघड झाली आहे,” असा खळबळजनक आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी…
नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल; कणकवलीतील ‘त्या’ भावनिक भाषणाने प्रकृतीबाबत वाढवली चिंता?
विशेष प्रतिनिधी:राजकीय आखाड्यात कधीही न थकणारा योद्धा म्हणून ओळखले जाणारे भाजप खासदार नारायण राणे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना हृदयाशी संबंधित त्रासामुळे रुग्णालयात आणण्यात आले असून, सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार…










