आम्ही अस्सल मराठी बोलणारे हिंदू आहोत” – उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई, दि. ११ : प्रतिनिधी महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने प्रचारही जोरदार ठरला. मुंबई मनपासाठी ठाकरे बंधूंची शिवाजी पार्कवर संयुक्त सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. “आम्ही अस्सल मराठी बोलणारे हिंदू आहोत. इतक्या पोटतिडकीने बोलल्यानंतर…
मुंबईकरांसाठी महायुतीचा ‘वचननामा’ जाहीर
मुंबई, दि. ११ प्रतिनिधी:मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीने आपला वचननामा (जाहीरनामा) प्रसिद्ध केला. खरं तर, शिवसेना-मनसे युतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर, महायुतीचा जाहीरनामा कधी येणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री…
इंडियन आयडल-३ चा विजेता प्रशांत तमंग काळाच्या पडद्याआड
नवी दिल्ली, दि. ११ वृत्तसंस्था:मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. इंडियन आयडल सीझन ३ चा विजेता प्रशांत तमंग याचे आजरोजी वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. प्रशांतच्या अचानक जाण्याने संगीत सृष्टीसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
‘धारावी कोणाची बापजाद नाही!’—विक्रीच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार, प्रत्येक धारावीकराला घर देण्याचा एल्गार
विशेष प्रतिनिधी:मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धारावीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण आक्रमक मोडमध्ये दिसले. धारावी खासगी व्यक्तीला दिल्याच्या आरोपांवर थेट पलटवार करत त्यांनी ठणकावून सांगितलं—“धारावी विकलेली नाही, आणि विकली जाणारही नाही. कोणीही विकासक येऊन धारावी गिळंकृत करणार नाही.” या शब्दांतच…
ठाकरे बंधूंच्या एकत्र सभेवर न्यायालयीन सावट? ‘ध्वनी प्रदूषण’च्या नावाखाली सदावर्तेंची थेट कोर्टात धडक
विशेष प्रतिनिधी:मुंबई महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापलेले असतानाच, शिवतीर्थावर होऊ घातलेल्या ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक सभेआधीच वादाचे ढग दाटून आले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संयुक्त सभेविरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी…
दळणवळणातून औद्योगिकीकरणाची नवी इकोसिस्टिम
देवेंद्र फडणवीस यांनी दिले सोलापूर शहराच्या विकासाचे आश्वासन जिथे विमानसेवा होऊ शकते ही कल्पनेपलीकडची गोष्ट होती तिथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दूरदृष्टीतून विमानतळच उभे राहिलेलले नाही तर येथे नाइट लँडिंग सुरू करण्यावरही आम्ही भर देणार आहोत. येथे वंदे…
सत्तेसाठी साजिश की लोकशाहीवर हल्ला? फडणवीसांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा कट उघड, स्टिंग ऑपरेशनने महाराष्ट्र हादरला
विशेष प्रतिनिधी:राज्यात महापालिका निवडणुकांचा प्रचार ऐन शिगेला असताना, महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का देणारा एक स्फोटक आणि अस्वस्थ करणारा खुलासा समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी सुनियोजित कट रचण्यात आल्याचा धक्कादायक दावा स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाला आहे….
मुंबई महाराष्ट्राची नाही? निवडणुकीआडून ओळख पुसण्याचा डाव, अण्णामलाईंच्या विधानाने रण पेटलं
विशेष प्रतिनिधी:मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना भाजपने प्रचारासाठी बाहेरच्या राज्यांतील नेत्यांची फौज उतरवली आणि त्याच क्षणी मुंबईच्या अस्मितेशी थेट खेळ सुरू झाला. उत्तर प्रदेश, बिहारनंतर थेट तामीळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अण्णामलाई मुंबईत अवतरले. वॉर्ड क्रमांक 47 मधील प्रचारात त्यांनी जे…
₹1500 देऊन अब्रू विकत घेताय?—लैंगिक अत्याचारातील सहआरोपीला नगरसेवकपद, राऊतांचा भाजपवर घणाघात
विशेष प्रतिनिधी:बदलापूरच्या एका शाळेत एका चिमुरडीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराने राज्याचे मन हादरलेले असतानाच, या प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यालाच भाजपने कुळगाव बदलापूर नगरपरिषद मध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून नेमल्याची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. न्याय, नैतिकता आणि सार्वजनिक…
नाशिकात दोन्ही ठाकरे गरजले
नाशिक, दि. ९ प्रतिनिधी:१५ जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा नाशिक हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब ग्राऊंड), शिवाजी नगर येथे संपन्न झाली. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव…










