या वेब सीरीजमध्ये इंटिमेट सीन्सचा भडीमार, पाहण्यापूर्वी हेडफोन नक्की वापरा नाहीतर…

तुम्ही वीकेंडला घरी बसून सुट्टीचा आनंद घेण्यासाठी ओटीटीवर मनोरंजनाचे पर्याय शोधत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. ओटीटीवर एक सीरीज तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकते.  ‘फॉरबिडन लव्ह’ अँथॉलॉजी वेब सीरीज एक चांगला पर्याय आहे. चार चित्रपटांची ही सीरीज ZEE5 वर प्रसारित होत आहे.

या वेब सीरीजमध्ये इंटिमेट सीन्सचा भडीमार

अँथॉलॉजी फिल्म ‘फॉरबिडन लव्ह’ ही एक प्रेमकथा आहे. हा चित्रपट  एक अशा गोष्टीवर लक्ष केंद्रीत करतो, जो समाजाला नेहमीच जगापासून लपवून ठेवायचा असतो. या वेब सीरीजमध्ये चार कथा दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटात इंटिमेट सीन्सही भरभरुन आहेत. यामध्ये पत्रलेखा आणि पूजा कुमार यांनी जबरदस्त इंटिमेट सीन चित्रित दिले आहेत. ज्यामध्ये पूजा कुमारच्या इंटिमेट सीन्सनी लक्ष वेधलं आहेत.

फॉरबिडन लव्ह चार चित्रपटांची सीरिज

‘फॉरबिडन लव्ह’ या 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या वेब सीरीजमध्ये चार अँथॉलॉजी चित्रपट आहेत. प्रत्येक चित्रपटाची कथा रोमान्स, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेली आहे. पहिला चित्रपट म्हणजे ‘अरेंज्ड मॅरेज’ची कहाणी दाखवण्यात आली आहे. प्रदीप सरकार दिग्दर्शित या चित्रपटात अली फजल, पत्रलेखा आणि ओंकार कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. दुसरा चित्रपट ‘अनामिका’ आहे, ज्यामध्ये आदित्य सील, पूजा कुमार आणि हर्ष छाया यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

हे चित्रपट हेडफोन लावूनच पाहा

प्रियदर्शनच्या ‘अनामिका’मध्ये आदित्य सील आणि पूजा कुमार यांच्यात अनेक इंटिमेट सीन्स दाखवण्यात आले आहेत. ही वेब सीरिज एकट्याने पाहणं जास्त सोयीस्कर राहील, त्याशिवाय पाहण्यापूर्वी हेडफोन नक्की लावायला विसरु नका. या वेब सीरीजमधील तिसरा चित्रपट म्हणजे ‘रूल्स ऑफ द गेम’ हा अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित आहे. यामध्ये अहाना कुमारा, चंदन राय आणि आनंदिता बोस मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपटातही अनेक अश्लील दृश्ये आहेत.

मनोरंजनाचा चांगला पर्याय

संजय मांजरेकर दिग्दर्शित ‘डायग्नोसिस ऑफ लव्ह’ हा वेब सीरिजचा शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर आणि रणविजय मुख्य भूमिकेत आहेत. ही मालिका ZEE5 वर उपलब्ध आहे आणि जर तुम्ही या वीकेंडला अँथॉलॉजी चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर हा सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *