सीटीपीएस ॲश डंपिंगवरून दोन कंत्राटदारांमध्ये संघर्ष; चाकू-कुर्हाडीने हल्ला, एक मजूर जखमी
दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी; सहा आरोपींवर गुन्हे, एकास अटक, ११ अनोळखींचा शोध भद्रावती :तालुक्यातील सायवन परिसरात सीटीपीएस येथून निघणाऱ्या ॲश (राख) डंपिंगच्या कंत्राटावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चाकू व कुर्हाडीने हल्ला करण्यात आल्याने एक मजूर जखमी झाला…
चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजीची गाज आता दिल्लीत; वडेट्टीवार-धानोरकर वादाची पक्षपातळीवर चौकशी सुरू
मुंबई, विशेष प्रतिनिधी:चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणावरून काँग्रेसचे दोन दिग्गज नेते, विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात सुरू असलेला कलह आता विकोपाला गेला आहे. या अंतर्गत वादामुळे पक्षाच्या प्रतिमेचे आणि संघटनेचे मोठे नुकसान होत असल्याची गंभीर दखल काँग्रेस प्रदेश कमिटीने घेतली…
ट्रॅक्टर पलटून शेतकरी ठार , एक जखमी तळोधी (खुर्द) येथील घटना
शहर प्रतिनिधी ब्रम्हपुरी:ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी जवळील तळोधी (खुर्द) येथील शेतशिवारात तुरी भरलेला ट्रॅक्टर पलटून अपघात झाल्याने ट्रॅक्टर खाली दबून एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना आज दिनांक 12 फेब्रुवारी 2026 ला सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली….
भाजप आणि एमआयएममध्ये ‘छुपी युती’? काँग्रेसच्या पराभवानंतर सपकाळ यांनी नक्की कोणावर डागली तोफ?
विशेष प्रतिनिधी:चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत काँग्रेसला बसलेल्या धक्क्याने महाविकास आघाडीतील खदखद चव्हाट्यावर आली आहे. “अंजनगाव सुर्जी, अकोट आणि अचलपूरप्रमाणेच आता चंद्रपुरातही भाजप आणि एमआयएमची ‘अदृश्य युती’ उघड झाली आहे,” असा खळबळजनक आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी…
संगीता राजेंद्र खांडेकर चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर; उपमहापौरपदी प्रशांत आनंदराव दानव यांची निवड
चंद्रपूर १० फेब्रुवारी – चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी मा. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी ११ वाजता मनपा राणी हिराई सभागृहात विशेष सभा पार पडली. या सभेत भारतीय जनता पक्षाच्या संगीता राजेंद्र…
चंद्रपूरच्या महापौरपदाचा निकाल आता ‘१० जनपथ’वर? वडेट्टीवार यांच्या १८ नगरसेवकांनी दिल्लीत ठाण मांडल्याने धानोरकर गटाचे टेन्शन वाढणार?
विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली:चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमधील विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. हा वाद सोडवण्यासाठी माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या १८ समर्थक नगरसेवकांसह दिल्ली गाठली असून, नुकतीच त्यांनी…
काँग्रेसच्या गटबाजीचा वाद शासनाच्या दरबारी
प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील तेरा नगरसेवकांनी 23 जानेवारीला नागपूर विभागीय आयुक्तांसमोर गट नोंदविल्यानंतर त्याच दिवशी विजय वडेट्टीवार गटातील नगरसेवकांनी या गट नोंदणीवर आक्षेप घेतला. काँग्रेसचे एकत्रित गटनोंदणी करण्यात यावी अशी मागणी वडेट्टीवार गटाकडून करण्यात आली. यामुळे हा वाद आता विभागीय…
चंद्रपूर मनपात महाविकास आघाडी एकत्र येणार
अडीच-अडीच वर्ष महापौरपदासाठी काँग्रेस व शिवसेना (उबाठा) मध्ये सकारात्मक चर्चा – आ.विजय वडेट्टीवार चंद्रपूर : चंद्रपूर मनपा सत्तास्थापनेसाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींमध्ये आता काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात महत्त्वाची सहमती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘महापौरपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याबाबत…
चंद्रपूरचा गड राखण्यासाठी ‘मातोश्री’वर खलबतं! वडेट्टीवार-ठाकरे यांच्यातील ३० मिनिटांची चर्चा; ‘किंगमेकर’च्या भूमिकेवरून नवा ट्विस्ट?
मुंबई प्रतिनिधी:चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर सत्तेचा पेच अधिकच गडद झाला असून, आता राजकारणाचे केंद्रबिंदू मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थान ठरले आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये…
चंद्रपूरचा सस्पेन्स थ्रिलर : किंगमेकरच्या अटीने काँग्रेस-भाजपची कोंडी; महापौरपदाचा ‘पेच’ आता ‘मातोश्री’च्या दरबारी!
चंद्रपूर | विशेष प्रतिनिधी:चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी राजकारणात ‘काँटे की टक्कर’ निर्माण केली असून सत्तेचा रिमोट कंट्रोल आता शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या हाती गेला आहे. “अडीच वर्ष महापौरपद आमचेच, नाहीतर सत्तेला विसरा,” अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटाने…










