डिलीव्हरी बॉईज आणि ‘गिग’ कामगारांच्या कष्टाला आता कायद्याचे कवच; विम्यापासून पेन्शनपर्यंत मिळणार सर्व लाभ!
मुंबई, विशेष प्रतिनिधी:दिवसरात्र रस्ते तुडवणाऱ्या डिलिव्हरी बॉईजपासून ते ओला-उबर चालकांपर्यंतच्या ‘गिग’ कामगारांच्या आयुष्यात आता एक मोठा कायदेशीर बदल होणार आहे. आजवर कोणत्याही सामाजिक सुरक्षेशिवाय काम करणाऱ्या या हजारो हातांना आता विमा, आरोग्य सुविधा आणि निवृत्तीवेतनाचे हक्काचे संरक्षण मिळणार आहे. केंद्र…
सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांच्या ‘त्या’ कोड्यासारख्या हस्ताक्षराला आता कायमचा पूर्णविराम!
मुंबई, विशेष प्रतिनिधी:सरकारी रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांनी कागदावर नक्की काय लिहिलंय, हे समजण्यासाठी आता डोकं खाजवण्याची गरज उरणार नाही. वैद्यकीय चिठ्ठीतील (प्रिस्क्रिप्शन) डॉक्टरांच्या अस्पष्ट हस्ताक्षरामुळे होणारा घोळ संपवण्यासाठी राज्य सरकारने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि…
मुंबईकरांच्या ‘मोकळ्या श्वासा’वर आता खाकीचा पहारा; बागांमधील टवाळखोर आणि नशिखोरांना चाप बसणार!
मुंबई, विशेष प्रतिनिधी:मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात विरंगुळ्याचे साधन असलेल्या ८९५ उद्यानांची सुरक्षा आता अधिक कडक होणार आहे. बागांमध्ये वाढलेला गर्दुल्ल्यांचा वावर आणि महिला-मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता, राज्य सरकारने मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला संयुक्त कारवाईचे आदेश दिले आहेत. चांदिवलीचे आमदार…
नाशिकला संदीप फाऊंडेशनमध्ये एका वर्गात सार्वजनिक नमाज पठण
नाशिक । येथील नाशिक-त्रंबक रस्त्यावरील महीरवणी येथील संदीप फाऊंडेशन मध्ये एका वर्गामध्ये सार्वजनिक नमाज पठण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून याला उत्तर म्हणून शनिवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी महाआरती करण्यात येणार आहे….
स्री बीज तस्करी प्रकरणी ठाणे पोलिसांची नाशिक मध्ये छापेमारी
महानगरपालिकेची आयव्हीएफ सेंटरला नोटीस नाशिक । महिलांचे स्री बीज तस्करी प्रकरणी ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील तपास या सर्व प्रकरणाचे धागेदोरे नाशिक शहरापर्यंत आले असून एका आयव्हीएफ सेंटरला महानगरपालिकेच्या वतीने नोटीस देखील पाठविण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात चांगलीच खळबळ…
मंत्र्यांचे ‘कार्ड’ सक्तीचे, प्रशासनाचा ‘नकार’; एसटी प्रवाशांच्या सवलतीचा नक्की खेळ कुणी मांडला?
मुंबई, विशेष प्रतिनिधी:लालपरीने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांच्या सवलतीबाबत सध्या मंत्रालयात एक अजब ‘कात्री’ लागली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांना मिळणाऱ्या सवलतीच्या तिकिटांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) बंधनकारक करण्यावरून शासन आणि प्रशासन समोरासमोर आले असून, या गोंधळात सर्वसामान्यांचे मरण…
कोरा सातबारा परत मिळावा या साठी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बाळ गंगा धरण प्रकल्पग्रस्तांना दिली भेट
पेण : प्रतिनिधी समिर घायतळे बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. “कोरा झालेला सातबारा मूळ मालकांच्या नावे परत मिळावा” या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता…
गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त खारघरमध्ये ‘हिंद-दी-चादर’ भव्य कार्यक्रम; सर्व धर्म समानतेचा संदेश – मंत्री माधुरी मिसाळ
पनवेल (प्रतिनिधी) सर्व धर्म एकच आहे आणि जो दुसऱ्या धर्माचा सन्मान करतो तो धर्म नेहमी मोठा होतो, असे प्रतिपादन राज्याच्या अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांनी आज खारघर ओवे येथे केले. हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी…
गाळ्याबाहेर शेतमाल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची अनुज्ञाप्ती रद्द होणार
नवी मुंबई :मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारपेठेतील जे व्यापारी गाळ्याच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी शेतमाल विक्री करत आहेत. त्या व्यापाऱ्यांची अनुज्ञाप्ती रद्द करण्याची प्रक्रिया बाजार समितीने चालू केली आहे. यामुळे “दबंग” व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार…
बळीराजासाठी सरकारी तिजोरी उघडणार!
कर्जमाफीसाठी ६ हजार कोटींची मागणी; थकीत ‘FRP’ वरून कारखान्यांनाही दिला इशारा मुंबई: राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’च्या अंमलबजावणीसाठी सन २०२६-२७ या आगामी आर्थिक वर्षात तब्बल…








