ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचे भाऊ अँड्र्यू यांना अटक:एपस्टीन प्रकरणात नाव, 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप
लंडन:ब्रिटनमध्ये किंग चार्ल्स यांचे भाऊ अँड्र्यू यांना अटक करण्यात आली आहे. सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, गुरुवारी सकाळी ८ वाजता पोलिसांनी त्यांना सँडरिंगहॅम येथील त्यांच्या घरी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे आज अँड्र्यू…
तब्बल ७७ वर्षांनी अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर
वॉशिंग्टन, दि. २३ वृत्तसंस्था:अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) माघार घेतली आहे. संघटनेच्या जिनिव्हामधील मुख्यालयावरून देशाचा ध्वजही काढून टाकण्यात आला आहे. अमेरिकेच्या आरोग्य आणि परराष्ट्र विभागांनी ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाची पुष्टी करणारे एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, “अमेरिका…
ग्रीनलँड अमेरिकेचाच! ट्रम्पने फोटो शेअर करत दिला इशारा
वॉशिंग्टन, दि. २० वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. ट्रम्प यांनी ग्रीनलँडवरून एक वादातीत फोटो शेअर केला आहे. यामुळे युरोप आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प वारंवार ग्रीनलँडवर अमेरिकेचा दावा करत आहेत….
महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिकची भूमी
महापालिका निवडणुकीतील यशाबद्दल ठिकठिकाणी अभिनंदन झ्युरिक, 19 जानेवारी:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी आज झ्युरिक येथे आगमन झाले. 5 दिवसांच्या आपल्या या दौऱ्यासाठी येताच मराठमोळ्या पद्धतीने त्यांचे उत्स्फूर्त पद्धतीने स्वागत करण्यात आले. पारंपरिक वेश, पारंपरिक पद्धती आणि पारंपारिक उत्साहात मराठीजनांनी…
मोदींनी मौन बाळगल्यानेच भारताला टॅरिफचा फटका? अमेरिकन सचिवाचा दावा
वॉशिंग्टन, दि. ९ वृत्तसंस्था:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी भारतावर ५० टक्के आयात शुल्क (Import Duty) लादण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार संबंधात कटुता निर्माण झाली. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार करार अनेक…
व्हेनेझुएलावर कब्जा करण्याचा ट्रम्प यांचा हेतू नाही
न्यूयॉर्क, दि. ६ वृत्तसंस्था अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाचा व्हेनेझुएलावर कब्जा करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत स्पष्ट केले. व्हेनेझुएलातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत माइक…
अफगाणिस्तानात पावसाचा कहर: अचानक आलेल्या पुरात १७ जणांचा मृत्यू
काबूल, दि. ४ वृत्तसंस्था हंगामातील पहिल्या मुसळधार पाऊस अन हिमवृष्टीने अफगाणिस्तानातील दीर्घकाळापासून सुरू असलेला दुष्काळ मोडीत काढलाय, परंतु अचानक आलेल्या पुरामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पुरात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून, ११ जण जखमी झालेत….
मेक्सिकोमध्ये 6.5 तीव्रतेचा भूकंप
अमेरिकेतील देश मेक्सिकोमध्ये शुक्रवारी संध्याकाळी (भारतीय वेळेनुसार) 6.5 तीव्रतेचा भूकंप झाला. राजधानी मेक्सिको सिटी आणि नैऋत्येकडील गुएरेरो राज्याच्या काही भागांमध्ये त्याचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप सेवेने याची पुष्टी केली. भूकंपाच्या इशाऱ्यामुळे राष्ट्रपती क्लॉडिया शिनबाम आणि त्यांच्यासोबत पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या…








