मुंबई, दि.३१। प्रतिनिधी मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढून महिलांना ज्या अपमानकारक व अमानवी कृत्याला सामोरे जावे लागले या घटनेला २ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून सुद्धा त्या समाजकंटकांवर केंद्र सरकारने काहीही कारवाई केलेली नाही. अशा केंद्रातील निष्क्रिय भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे मुंबई काँग्रेस कार्यालय येथून कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी आझाद मैदान – सी एस टी स्टेशन जवळ हा मार्च अडवण्यात आला.
या कॅडल मार्च मध्ये वर्षा गायकवाड यांच्या समवेत आमदार अमीन पटेल,माजीं खासदार संजय निरूपम, माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेस कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा,माजी आमदार बाबा सिद्दीकी,अशोकभाऊ जाधव, आमदार जिशान सिद्दीकी, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा अनिशा बागूल तसेच मुंबई काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी आझाद मैदान जवळ हा मोर्चा अडवला व सर्व प्रमुख आंदोलनकर्त्यांना अटक केली. तत्पूर्वी या कॅण्डल मार्चंला कुलाबा पोलिसांनी गेट वे ऑफ इंडिया, रेडीओ क्लब येथे मनाई केल्याने अखेर तो आझाद मैदान येथे काढण्यात आला. महिला पोलीस उप निरीक्षक कमल कर्चे, निरीक्षक,प्रसाद राऊत, अमोल वाघमारे यांनी गेट वे ऑफ इंडिया येथे कोणत्याही स्थितीत येथून कॅण्डल मार्च निघणार नाही यासाठी वाहनातुन येणाऱ्यांना आल्या मार्गी परत फिरविले.