रामटेक

कॅम्प चेरी फार्म कडुण स्वच्छता व संवर्धन मोहिम

रामटेक ( प्रतिनिधी )ऐतिहासिक कपूर बावडी परिसरात गेल्या आठवडाभरापासून कॅम्प चेरी फार्म चमुने स्वच्छता व संवर्धन मोहिम राबवली. परिसरातील गाळ, कचरा व झाडाझुडपांची साफसफाई करून बारवेला (कपुर बावडी पाण्याच कुंड) पुन्हा स्वच्छ आणि सुरक्षित रूप देण्यात आले.दि.१५ फरवरी ला स्वच्छता…

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर रामधाम तीर्थ (मनसर) येथे ‘नामा’ अभंग संगीतमय एकपात्री प्रयोग संपन्न

रामटेक ( प्रतिनिधी )रामटेक तालुक्यातील मनसर येथील प्रख्यात रामधाम तीर्थ मनसर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दि.१५ फरवरी ला सायंकाळी ६ वाजता “नामा” या अभंग संगीतमय एकपात्री प्रयोगाचे ज्ञान योगी डॉ. दत्ताजी हरकरे यांनी सादरीकरण केले. हा प्रयोग चंद्रपाल चौकसे लोकसेवा…

समतादूताच्या वतीने तालुकास्तरीय अधिकारी यांना बार्टीची दिनदर्शिका भेट

रामटेक ( प्रतिनिधी )सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्यावतीने महासंचालक सुनील वारे, निबंधक तथा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे,विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड तसेच समतादूत…

नगरधन येथे मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन ९ फेब्रुवारीला

रामटेक ( प्रतिनिधी ):परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर तसेच सेवक परिवार नगरधन व समस्त बाबांचे सेवक-सेविका यांच्या संयुक्त विद्यमाने मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन व भव्य रथयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी…

सनराईज इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक समारंभ मोठ्या आनंदात संपन्न झाला

रामटेक ( प्रतिनिधी )दि.३१ जानेवारी २०२६ रोजी सनराईज इंटरनॅशनल स्कूलने आपला वार्षिक समारंभ मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने साजरा केला. विद्यार्थी, पालक आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रामटेक नगर परिषदेचे नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन होते. इतर पाहुण्यांमध्ये उपाध्यक्ष…

प्रत्येक घराचा महोत्सव म्हणून रामटेक महोत्सव नावारूपाला आणू – वित्त राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल

सुदेश भोसले, साधना सरगम यांच्या गाण्यांवर रामटेकच्या रसिकांनी धरला ताल ▪️द बांसुरीवाला कनेक्ट च्या युवा ग्रुपने आपल्या गीतातून जागविले राष्ट्रप्रेम ▪️रसिकांचा भरभरून प्रतिसाद नागपूर, दि. २ फेब्रुवारी: रामटेकचे राम मंदिर हे भोसले घराण्याने बांधले. आज एक भोसले दर्शन घेताना मला…

रामटेकच्या विकासासाठी स्व अजित पवार यांनी केलेले सहकार्य अनमोल– वित्त राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्‍वाल

रामटेक पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवात पद्मश्री सोनू निगम यांच्या गाण्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध रामटेक शहर व पंचक्रोशीतील रसिकांनी दिला उदंड प्रतिसाद नागपूर, दि. १ फेब्रुवारी: महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या रामटेक येथील पुरातन श्रीराम व इतर मंदिरे, येथील तलावांचे वैभव लक्षात घेवून सांस्कृतिक…

गणतंत्रदिनी केंद्रीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मान

रामटेक ( प्रतिनिधी )रामटेक नगरपरीषदेचे नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांच्या हस्ते गणतंत्रदिनी नगरपरीषद येथे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण करणार्‍यांचा सत्कार करण्यात आला. रामटेक नगरपरीषदेचे नवनियुक्त नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत उतीर्ण झालेल्यांना शाल,श्रीफळ,स्मृतीचिन्ह देवुन सत्कार केला….

रामटेकमध्ये तीन दिवस रंगणार सांस्कृतिक महोत्सव

दिग्गज कलाकारांची हजेरी : 30 जाने. ते 1 फेब्रुवारी ला सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सुदेश भोसले, साधना सरगम, कुमार विश्वास, सोनू निगम लावणार हजेरी रामटेक ( प्रतिनिधी )महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित रामटेक सांस्कृतिक महोत्सव २०२६ रामटेकच्या नेहरू मैदानावर आयोजित करण्यात आला…

रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व रस्ता सुरक्षा अभियानाच्या संयुक्त कार्यक्रम संपन्न

रामटेक ( प्रतिनिधी )रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालयात येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान कार्यक्रम व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम २० जानेवारी ला मंगळवार रोजी दुपारी एक वाजता संपन्न झाला.कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून महामार्ग पोलीस रामटेक येथील सहाय्यक…