रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व रस्ता सुरक्षा अभियानाच्या संयुक्त कार्यक्रम संपन्न
रामटेक ( प्रतिनिधी )रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालयात येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान कार्यक्रम व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम २० जानेवारी ला मंगळवार रोजी दुपारी एक वाजता संपन्न झाला.कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून महामार्ग पोलीस रामटेक येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण बकाल उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विभाग प्रमुख प्रा. चेतना उके होत्या तर त्याचबरोबर मंचकावर प्रा. मीरासे ही उपस्थित होते. 21 जानेवारी 2026 ते 31 जानेवारी 2026 पर्यंत च्या काळ रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान म्हणून राबविण्यात येतो.
हेल्मेट व सीटबेल्ट न वापरल्याने, वेगमर्यादेचे पालन न केल्याने व दारू पिऊन वाहन चालविने भारतात अपघाताचे प्रमाण वाढले असून सर्वांनी वाहतूक नियमाचे पालन केल्यास रस्ते अपघात व मृत्यूदर कमी करणे आपण सर्वांना सहज शक्य आहे असे अरुण बकाल सर यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांना जर स्पर्धा परीक्षा बद्दल आवड असेल, जिद्द असेल व त्याग करण्याची क्षमता असेल तर कुठलीही परीक्षा पास करणे सहज सोपे आहे असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वक्तव्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमित हटवार यांनी केले तर आभार प्रा. मेश्राम यांनी केले. यावेळी प्रा. ज्ञानेश्वर नेवारे, प्रा. खोब्रागडे, प्रा. डॉली कळमकर, प्रा.आकाश मोहबिया, प्रा. वासनिक, प्रा. पारूल झाडे, प्रा. विलास मडावी, सुरेश करेमोरे, गीता समर्थ, राजू मोहनकर, संदीप ठाकरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




