नागपूर जिल्हा भिवापुर

युवकास कुऱ्हाडीने ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा, तातोली येथील प्रकरण

आरोपी सुरज शालीकराम कामडी यास जन्मठेपेची शिक्षा 

भिवापूर (प्रतिनिधी )तालुक्यातील तातोली येथे आपल्या आईसोबत गावातील एका युवकाचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याला कुऱ्हाडीने डोक्यावर व मानेवर जबर हल्ला करून त्यास ठार मारल्याची घटना चार वर्षापूर्वी म्हणजेच 27 जुलै 2020 ला घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती.या प्रकरणी आरोपी 23 वर्षीय युवकाला विविध कलमान्वये अटक केली होती. सदर प्रकरण नागपूर जिल्हा सत्र न्यायालया दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणीन्यायाधिश जाहीर अब्बास शेख यांनी या प्रकरणी निवाडा देत आरोपी सुरज कामडी यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
भिवापूर पासून 7 किंमी अंतरावर असलेल्या तातोली येथील 23 वर्षीय सुरज शालीकराम कामडी यांचे घरी विशाल विश्वनाथ गजघाटे वय 25 वर्षे रा. तातोली तालुका. भिवापूर यांचे घरी येणे -जाणे होते. सुरज कामडी यास आपल्या आई सोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून दोघामध्ये शाब्दीक बाचबाची होवून होवून त्यांचे रूपांतर भांडणात झाले. अशात आरोपी सुरज शालीकराम कामडी याने कुऱ्हाडीने आरोपीच्या डोक्यावर व मानेवर जबर हल्ला चढवीत त्यास गंभीर जखमी केले. यात विशाल गजघाटे यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला होता. याप्रकरणी भांदवि कलम 302 सहकलम 2 (3) ॲट्रासिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरण जिल्हासत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. न्यायाधीश जाहीर शेख यांच्या पुढे साक्षी पुरावे तपासण्यात आले.यात 20 साक्षिदाराचे जवाब तपासण्यात आले. या प्रकरणी आरोपी सुरज शालीकराम कामडी यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. व 10 हजार रुपयाचा दंड ठोठावला. असून सदर प्रकरणी सरकारी वकिल ॲड. प्रशांत साखरे यांनी बाजु मांडली त्यांना पोलिस उपनिरीक्षक तुलाराम खडसे यांचे सहकार्य मिळाले. सदर प्रकरणात उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन, ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *