नागपूर जिल्हा भिवापुर

भिवापूर पोलिस स्टेशनमध्ये शस्त्र प्रदर्शनी

निशा जांभुळे (प्रतिनिधी)भिवापूर पोलीस स्टेशन येथे आज दि. ३ जानेवारीला सकाळी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस निमित्य सर्व प्रकारची शस्त्र बाबतची माहिती विविध शाळेतील विद्यार्थ्याना देण्यात आली. भिवापूर पोलिस स्टेशन परिसरात ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी शहरातील विविध शालेय संस्थेच्या विद्यार्थ्याला शस्त्र पदर्शनी पाहण्यासाठी आमंत्रीत केले होते.

या प्रदर्शनीला सायंटिफिक कॉन्व्हेन्ट , राष्ट्रीय विद्यालय , विद्यानिकेतन इंग्लीश मिडीयम स्कूल येथील विद्यार्थिनी यांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. तसेचयेथील पत्रकार बंधूंसाठी भेट आयोजीत करून पोलीस विभागाची रचना याची माहिती देऊन पोलीस स्टेशन मध्ये चालणाऱ्या कामकाजाबाबत आवश्यक व योग्य माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थिनींना महिला संबंधी गुन्हे, सायबर क्राईम, डायल – ११२ वाहतुकीचे नियम, महिला अत्याचार, सोशल मीडिया वापर, पॉक्सो ॲक्ट तसेच इतर विषयांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन उरकुडे साहेब एपीआय त्रिपाठी एएस आय रमेश येडे पोलीस हवालदार प्रवीण जाधव पोलीस हवालदार आनंद धात्रक
पोलीस हवालदार प्रदीप मने, पोलीस अंमलदार रवी वानखेडे, सुरज हिवरकर, प्रीतम खोपे, मिलिंद राठोड सतीश रघोर्ते समादेशक आयूब पठाण, सर्व होमगार्ड सैनिक यावेळी उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *