निश्वार्थी निस्पृह भावनेने काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची समाजात कमतरता असताना समाजमन आणि समाजभान जपत तसेच सामाजिक क्षेत्रातील परिस्थिती बघता जनसामान्य जनतेच्या शासकीय कामात येत असलेल्या अडीअडचनी सोडविणे तसेच त्यांची कामे पुर्णत्वास नेत समाजकार्यासाठी स्वतःला वाहून सामाजीक बांधीलकी राखत आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे जनसामान्यांच्या मनामनात बसलेले एक नावारूपास आलेले झंझावाती वादळ म्हणजेच सामाजिक कार्यकर्ते चेतनजी पडोळे….. !!
‘ केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहीजे, ‘ या उक्तीनुसार कोणतीही गोष्ट तडीस नेत स्वतःला समाजकार्यात वाहून घेत समाजातील रंजल्या गांजल्या सामाजिक घटकामध्ये आपूलकीची भावना निर्माण करीत समाजससमर्पीत काम करणारे नावारूपास आलेले सामाजिक कार्यकर्ते चेतनजी पडोळे….. !!!
चेतनजी पडोळे यांना माणसांना भेटण्याची, त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधण्याची आणि अनोळखी माणसांना आपलसं करण्याची जणू त्यांच्यात जादूच आहे. नि:श्वार्थ भावनेने समाजसेवा करणे हाच शुद्ध हेतू मनी बाळगत त्यांनी समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले. चेतनजी यांनी आपले अवघे आयुष्य समाकार्यासाठी वाहून घेतले असून सदैव गोरगरीबांच्या मदतीला धावून जाणारे मुर्तीमंत उदाहरण आहे त्याच अनुशंगाने जनसामान्यांच्या कामासाठी त्यांनी भिवापूर तहसिल कार्यालयात दर शुक्रवारी येत माझे कर्तव्य माझी जबाबदारी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
शासकीय योजना ह्या गोरगरिबांसाठी असून त्या योजनेचा लाभ जनसामान्यांना मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशिल असतात. ते शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, सामान्य जनतेच्या अडचनी समजून त्या सोडविणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला लढा देत वाचा फोडणे यासारख्या सामाजिक कार्यात ते अग्रेसर आहेत शासनाची योजना जनतेच्या हितासाठी असते त्यामुळे ती योजना जनतेपर्यंत कशी पोहचवता येईल यासाठी ते आपली जबाबदारी म्हणून प्रयत्नशील असतात आणि त्यासाठी ते दर शुक्रवारला आपला अमुल्य वेळ जनतेसाठी काढून संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधतात आणि जनतेची कामे मार्गी लागण्यापर्यंत पाठपुरावा करतात. चेतनजी पडोळे यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड होती ते अगदी लहाणापासून तर थोरांपर्यंत सर्वांशी आपुलकीने वागत असल्याने सर्वांना परिचीत आहेत आपल्या नेतृत्वातून व सहकार्यातून गोरगरीब जनतेला फायदा कसा होईल यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात त्यामुळे समाजसेवी उपक्रमांचे आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार असतो. तालुक्यात कुठेही सांस्कृतीक, क्रिडा या व्यतिरीक्त कोणत्याही कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित राहतात.
चेतनजी पडोळे सात्वीक विचारधारा आणि अंगी कतृत्ववान असलेलं सजग व्यक्तीमत्व आहे सामाजिक आणि राजकीय तळमळ त्यांच्या अंतरंगातून सतत वाहत असते काम करण्याचा उत्साह त्यांच्या रक्तातच भिनलेला असतो.
सतत समाजकार्यात स्वतःला वाहून घेतलेले चेतनजींचे जीवन म्हणजे जनतेसाठी सेवाभावाचा आदर्श,
त्यांचे शब्द म्हणजे धैर्य देणारे मार्गदर्शन आणि त्यांचे कार्य म्हणजे संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणास्थान आहे. त्यांच्या सहकार्यामुळे अनेक जीवनांना आधार मिळाला असून
हीच त्यांची खरी ओळख असून त्यांच्या कार्याची पावती आहे.




