रामटेक ( प्रतिनिधी )सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्यावतीने महासंचालक सुनील वारे, निबंधक तथा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे,विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड तसेच समतादूत प्रकल्प व्यवस्थापक डॉ. सुमेध थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कार्यालयास उपयुक्त व उत्तम दर्जाच्या दिनदर्शिका महाराष्ट्रातील तालुकास्तरीय अधिकारी यांना सप्रेम भेट देण्याचा अनोखा व नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गतच उपविभागीय अधिकारी तालुका रामटेक प्रियेश महाजन, गटशिक्षणाधिकारी जयसिंग जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, तहसीलदार रमेश कोळपे,आरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्नेहल राऊत, नगरपरिषद मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांना तालुका रामटेकचे समतादूत राजेश राठोड यांनी सुपूर्द केले.
संविधानातील मुल्ये, संत, महापुरुषांचे समता विचार व शासनाच्या जनकल्याणकारी योजना, बार्टी अंतर्गत कार्यरत योजना विभाग याचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने बार्टी अंतर्गत समतादुतांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमबाबत अधिकारी वर्गात समाधान व्यक्त केला जात आहे.




