नागपूर जिल्हा भिवापुर

जलजिवन मिशन अंतर्गत अर्पण दिवस साजरा

निशा जांभुळे ( प्रतिनिधी ) भिवापूर:ग्रामपंचायत महालगाव अंतर्गत चिखलापार येथे जलजीवन मिशन अंतर्गत जल अर्पण दिवस व लोकार्पण साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला उद्‌घाटक म्हणून उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम उपस्थित होते.

यावेळी हस्ते स्विच रूमचे उदघाटन आमदार संजय मेश्राम यांचे हस्ते संपन्न झाले. या योजनेचे हस्तांतरण सरपंच जिवतोडे यांना करण्यात आले. सदर कार्यक्रमाला गटविकास अधिकारी डॉ चेतन जाधव , जिल्हा परिषद सदस्य शंकर डडमल, माजी जि. प सदस्य नंदाताई नारनवरे, कृ.उ.बा समिती संचालक देशमुख, उपविभागीय अभियंता अमित तूरकर , सरपंच अल्का जिवतोडे सचिव किर्ती चौधरी, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, BRC, CRC, ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, केंद्र चालक, बचत गट, भजन मंडळ, गावकरी इत्यादी उपस्थित राहून जल अर्पण दिवस एक उत्सव म्हणून साजरा करण्यात आला.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *