बदलापूर

बदलापुरमध्ये स्त्री बीज विक्री रॅकेटचा पर्दाफाश, संशयतांना सात दिवसांची पोलीस कोठडी

बदलापूर, दि.२१,प्रतिनिधी:बदलापुर शहरात घरातूनच बेकायदेशीररीत्या गर्भाशयातील स्त्री बीज (अंडी) वाढवून त्याची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे. या प्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केले आहे, आणि हा रॅकेट मोठ्या प्रमाणावर चालत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
बदलापुर पूर्वेतील जोवेली परिसरात महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील स्त्री बीज वाढवण्यासाठी इंजेक्शन्स देण्यात येत होते आणि गैर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सोनोग्राफी करून प्रक्रियेचे पालन केले जात होते.नंतर त्या महिलांना IVF किंवा ART सेंटरमध्ये पाठवून ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांच्या अंड्यांचे निष्कर्षण केले जात होते. त्यानंतर या अंड्यांची बेकायदेशीर विक्री तस्करी केली जायची असे गंभीर प्रकरण आहे.
आरोपींच्या मोबाईलमध्ये गर्भधारणेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शन्सचे फोटो, सोनोग्राफीचे छायाचित्रे, बनावट कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे आढळले आहेत.
अटक आणि पोलीस कारवाई
या प्रकरणात सुलक्षणा जयवंत गाडेकर(रा. जोवेलीगांव बदलापूर पूर्व), अश्विनी चाबुकस्वार(सुभाषटेकडी,उल्हासनगर-४) आणि मंजुषा वानखेडे(सुभाषटेकडी,उल्हासनगर-४) या तिघींविरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तपास पुढे सुरू असून अधिक आरोपी समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान,या प्रकारामुळे बदलापुर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, हा रॅकेट वैद्यकीय आणि कायदेशीर नियमांचे उल्लंघन करत, गरजू महिलांचा शारीरिक आणि आर्थिक शोषण करून चालवला जात असल्याचे प्रथम तपासात समोर आले आहे.
या प्रकरणाची सरकार तर्फे फिर्याद बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांनी दिली

देशभरात कनेक्शन?

रॅकेटचे देशभरात कनेक्शन असल्याचा संशय असून त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.काही IVF सेंटरमध्ये तपास सुरू आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जवळपास ४० पीडित महिला असून त्यांना १५ ते २० हजार रुपये देऊन त्यांच्या शरीरातील स्त्री बीज काढून डॉक्टर आणि IVF सेंटरमार्फत विक्री करण्यात यायची, अशी माहिती मिळाली आहे.

संबंधितांना पोलीस सात दिवसांची कोठडी

संबंधित महिला आरोपींना अटक करण्यात आली असून ७ दिवसांचा पीसीआर मिळालेला आहे. यामध्ये सखोल चौकशी करण्यात येणार असून आणखी कोणी लोकं सहभागी आहेत का? याचा तपास सुरू आहे.
सचिन गोरे – पोलीस उपायुक्त, परिमंडळ ४, उल्हासनगर, ठाणे शहर

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *