अकोट अकोला जिल्हा

मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्म्यांचे वाटप

अकोट: रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ अकोट तर्फे भव्य प्रमाणावर मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्म्यांचे वाटप नगर परिषद अकोटच्या महिला व बालकल्याण सभापती सौ नयनाताई विशाल इंगोले, डॉक्टर विशाल इंगोले, नगरसेवक श्री स्नेहल दाभेराव यांचे तर्फे टाकपुरा येथील मारुती संस्थान चे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये एकूण 804 रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात येऊन 512 गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वितरण आयोजकांतर्फे करण्यात आले. सदर शिबिरामध्ये परिसरातील सर्व धर्माच्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. डोळ्यांची तपासणी झालेल्या रुग्णांपैकी जवळपास 150 रुग्णांना पुढील मोतीबिंदू तपासणी करिता रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे चालविण्यात येणाऱ्या रोटरी आय हॉस्पिटल येथे पाचारण करण्यात आले. रोटरी आय हॉस्पिटल तर्फे डॉक्टर अनिल चेडे व ऑप्टोमेट्रीस्ट श्री ज्ञानेश्वर इखार यांनी सदर शिबिरामध्ये आपली सेवा दिली
रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत आयोजित केलेल्या सदर शिबिराचे उद्घाटन सर्वप्रथम डॉक्टर विशाल इंगोले तसेच श्री प्रभाकरराव मानकर, नगराध्यक्षा सौ. मायाताई धुळे, उपाध्यक्ष श्री. प्रथमेश बोरोडे रोटरी क्लब ऑफ अकोटचे अध्यक्ष रवी पवार,कु.चंचलताई पितांबरवाले यांच्या हस्ते धन्वंतरी पूजनाने झाले . याप्रसंगी श्री किशोर जुनघरे पोलीस निरीक्षक ग्रामीण, नगरसेवक अमोल पालेकर, मंगेश लोणकर, रवी ठाकूर ,बादल अहिर, निलेश नवघरे, इम्रान खान, मनोज चंदन, जितेश बरेठीया हे सन्माननीय नगरसेवक उपस्थित होते.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ अकोटचे सचिव डॉक्टर नावेश मोहता, रवी भाऊ मुंडगावकर, चंदूभाऊ अग्रवाल, सुरेश व्यवहारे ,राजकुमार गांधी, संतोष इस्थापे, शिरीष पोटे, दीपक कतोरे, उद्धव गणगणे, विजुभाई सेदानी तसेच रणजीत खेडकर ,सुशील लोणकर ,विनोद रेळे ,अनुप मुंडगावकर आधी उपस्थित होते. शिबिर यशस्वी होण्याकरिता श्री दिनेश मेनसे, मुकेश कहार, प्रवीण यादव, श्याम धुराटे, पप्पू कैसर, करण सोळंके भूषण लिल्हारे , प्रतीक लिल्हारे , विपुल शेले, यश बेलोकार,बाबूसिंग खन्नाडे, सुशील लोणकर, श्रीपाद धर्माधिकारी, संदीप लोणकर ,विशाल चौधरी व इतर अनेक युवकांनी अथक परिश्रम घेतले

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *