रोटरी क्लब ऑफ अकोट च्या वतीने पत्रकार दिनानिमित्त शहरातील व तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला
मराठी पत्रकारितेचे दर्पणकार बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ अकोट चे अध्यक्ष इंजि.रवि पवार,प्रमुख उपस्थिती प्रभाकरराव मानकर,प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार संजय आठवले,डॉ.नवेश मोहता व्यासपीठावर उपस्थित होते.
समाजप्रबोधन,लोकशाही बळकटीकरण तसेच जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात पत्रकारांचे योगदान मोलाचे असल्याचे इंजि.रवि पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करताना पत्रकार हे समाजाचे आरसे असून त्यांच्या निर्भीड व वस्तुनिष्ठ लिखाणामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येतो,असे मत व्यक्त केले.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारांच्या कार्याचा गौरव करणे ही रोटरी क्लबची सामाजिक बांधिलकी असल्याचेही प्रभाकरराव मानकर यांनी सांगितले.
यावेळी विविध माध्यमे व वृतपत्रांमध्ये कार्यरत असलेल्या राहुल कुलट,सोनु सावजी,राजेश सोळंके,चंचल पितांबरवाले,नितीन तेलगोटे,युवराज मंगळे,अभिषेक पाठक,देवानंद खिरकर,धीरज बेलसरे,विशाल आग्रे आदी पत्रकार बांधवांचा स्मृतिचिन्ह व पेन देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी रोटरी क्लब ऑफ अकोट चे इंजि.प्रमोद लहाने,दिपक कतोरे,संतोष इस्तापे,चंदुसेठ अग्रवाल,राजकुमार गांधी,उद्धवराव गणगणे,हिमांशु अग्रवाल उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्याम शर्मा तर आभार प्रदर्शन डॉ.नवेश मोहता यांनी केले.




