शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार . वृत्तलिहिपर्यंतही गुन्हा दाखल झाला नाही.
संग्रामपूर(रामेश्वर गायकी)ः- तालुक्यातील
पातुर्डा येथील शिक्षिका महिलेचा जळगाव (जा.) तालुक्यातील चावरा (सखारामपूर)फाटा येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघातात मृत पावल्याची घटना आज ऐन होळी सणाचे दिवशी २/ मार्च रोजी सकाळी ७ वा. घडली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की ,संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील महिला शिक्षिका वृषाली प्रकाश गावंडे वय ३५ वर्ष ह् जळगाव (जा.) तालुक्यातील पिंपळगाव (काळे) येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. सध्या १०वी आणि १२ वीच्या परीक्षा असल्यामुळे शाळा सकाळच्या सत्रात आहेत. नेहमी प्रमाणे त् वृषाली प्रकाश गावंडे ह्या दररोज पातुर्डा ते पिंपळगाव (काळे ) येणे -जाणे करत होत्या .त्यानुसार दैनंदिन प्रमाणे आज दि. २/ मार्च रोजी ऐन होळी सणाचे दिवशी सकाळी ६वा.त्या आपल्या पातुर्डा येथील राहत्या घरुन.दुचाकी क्र. एम एच 28 ए एल 5825 या स्कूटी ने पिंपळगाव (काळे) साठी निघाले असता कवठळ -भेंडवळ रस्त्यावरील चावरा फाटा येथे गेल्या असता काळाने मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. व काही अंतरावर जाऊन फेकल्या गेल्या. फेकल्यानंतर त्यां डोक्यावर आदळल्या. त्यामुळे त्यांना मेंदू वर मार लागला.अन् त्यांचा जागेवरच मृत्यू झाला असे समजते. अपघात इतका भयंकर होता की परिसरातील शेतकरी यांना अपघाताचा आवाज आला. लगेच परिसरातील शेतकरी वर्ग घटनास्थळी जमा झाले. मात्र तो पर्यंत वृषाली गावंडे यांनी आपला प्राण गमावला होता. स्थानिक नागरिकांनी लगेच जळगाव(जा.) पो. स्टे. व त्यांच्या घरच्यांना माहिती दिली.असता त्वरीत घटनास्थळी जळगाव (जा.) पो. स्टे.चे अधिकारी ,कर्मचारी दाखल झाले व पंचनामा केला. पंचनामा झाल्यानंतर रुग्णवाहिके द्वारे प्रेताला जळगाव (जा.) ग्रामीण रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले. नंतर प्रेत त्यांचे परिवाराच्या स्वाधीन करण्यात येवून दु. १वा,अंतिम संस्कार करण्यात आले.त्याच्या पश्चात पती, ५ वर्षाचा मुलगा,सासू,सासरे,आई,वडील,भाऊ असा बराच मोठा परिवार आहे. संग्रामपूर तालुक्यातील जस्तगाव हे त्यांचे माहेर गाव असून त्या आदर्श शिक्षक स्व.श्रीरामा गावंडे ह्याच्या नातसुन आहेत.. वृत लिहेपर्यंत आद्यापही पो.स्टे.ला गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती मिळाली आहे.




