बुलढाणा जिल्हा

संग्रामपूर तालुक्यात अवैध देशी दारू वाहतुकीवर कारवाई

एक लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा दाखल !

संग्रामपूर :- तालुक्यात काही देशी दारु दुकानवरुन अवैध देशी दारूची वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार माहिती मिळाल्यावरुन करणाऱ्यांविरोधात सोनाळा पो.स्टे, पोलिसांनी कारवाई करत सुमारे १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई दि.९ /फेब्रुवारी रोजी टूनकी ते लाडनापूर रोडवर करण्यात आली आहे.
याबाबात मिळालेल्या माहिती नुसार संग्रामपूर तालुकूयातील टुनकी ते लाडणापूर रोडवर पोलिसांनी संशयीत वाहनावर छापा टाकला असता या कारवाईत दोन निळसर पिशव्यांमध्ये ‘बिग बॉस ५ हजार या ब्रँडच्या देशी दारूचे ९० मि.ली, चे ८ बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये १०० शिश्या असून एकूण ८०० शिश्या जप्त करण्यात आल्या.

प्रत्येकी ४० रुपये किंमतीनुसार सुमारे ३२ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी काळ्या रंगाची विनानंबर युनिकॉर्न मोटारसायकल अंदाजे किंमत ७० हजार रुपये जप्त करण्यात आली. असा एकूण १ लाख २० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.या प्रकरणी ओंकार पुंडलीक फुंसे वय ५३ वर्षे, लोकेश रमेश सुलताने वय २९, दोन्ही रा. जामोद, ता. जळगाव (जामोद)., जि. बुलडाणा यांच्याविरुद्ध पोलीस कर्मचारी राहुल पवार यांच्या फिर्यादीवरून कायम गुन्हा क्र. ४१/२०२६ कलम ६५ (अ) (ई) म.दा.का. कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.पुढील तपास ठाणेदार संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार विनोद वानखडे हे करीत आहेत.

[ तालुक्यात काही विशिष्ट देशी दारु दुकानातून काही लोक देशी दारुचे बाॕक्स ठराविकृ दिवशी मोठर सायकलने देशी दारु दुकानातून खेड्यापाड्यात देशी दारु पोहचत असून अवैध देशी दारु विक्री करीत असल्याने नव तरुण युवक व्यसनाधिन बनत आहेत. ह्याबाबीकडे संबंधित विभाग व पोलीसांचेही दुर्लक्ष होत आहे.ही गंभीर बाब आहे. त्यामुळे अवैध देशी दारु विक्रेत्यावर कारवाई होणं आवआहे.अशी ग्रामीणा भागातील नागरिकाःची मागणी आहे.].

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *