शहर प्रतिनिधी,नांदुरा. नांदुरा शहरात गांजा घेऊन येणाऱ्या एका आरोपी च्या ताब्यातुन पोलिसांनी दिड लाखाचा गांजा जप्त केला.नांदुरा ते जळगांव जामोद रोडवर असलेल्या लक्ष्मी नगर ले आउट मध्ये ९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली . या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शेख अन्वर शेख रशीद वय ६४ रा.बाळापुर फैल खामगाव याच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे.
या बाबत प्राप्त माहितीनुसार , आरोपी शेख अन्वर शेख रशीद हा जळगांव जामोद रोडवर असलेल्या लक्ष्मी नगर ले आउट या भागात गांजा घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील राहुल ससाने यांना मिळाली होती. ही बाब त्यांनी आपले वरीष्ठ ठाणेदार जयवंत सातव यांना सांगितली. ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नितीन चव्हाण , एएस आय मिलिंद जवंजाळ , ठाणेदार सातव यांचे रायटर कैलास सुरडकर, राहुल ससाने , विनोद भोजने , संदिप डाबेराव, रवि सावळे , सुनील सपकाळ व पंकज डाबेराव यांनी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी लक्ष्मी नगर ले आउट मध्ये सापळा रचला. दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपी या भागात आढळुन येताच पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ एका पीशवीत २.९९८ किलो ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी सदर गांजा किंमत १ लाख ४९ हजार ९०० रुपये पंचासमक्ष जप्त करून आरोपीस अटक केली. या प्रकरणी पोलिस नाईक राहुल ससाने यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली . त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख अन्वर शेख रशीद याच्या विरोधात अप. क्रं. ७९ /२०२६ कलम ८ (क), २० (ब), 22 (ब) गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मानवी मेंदुवर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपिएस / कॅनबीस) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पीएसआय नितीन चव्हाण हे करीत आहेत.




