विवेकानंद सार्वजनिक वाचनालय नांदुरा येथे दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिन संपन्न झाला या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक श्री रुस्तमजी होनाळे हे उपस्थित होते.
ते आपले विचार मांडताना म्हणाले अमृताची पैज जिंकेल अशी समृद्ध आपली मराठी भाषा आहे .परंतु आपणच आपल्या या भाषेची गळचेपी करतो आहे आम्ही संभाषणात इंग्रजी भाषेचा जास्त वापर करतो .पूर्वीच्या काळात आमच्या संतांनी मराठी भाषेतून साहित्य निर्मिती करून भाषेचा गौरव वाढविला . असंख्य साहित्यकारांनी मराठीतून साहित्य निर्मिती करून आपल्या मराठी भाषेची सेवा केली तसेच वि दा करंदीकर ,भालचंद्र नेमाडे वि स .खांडेकर व वि .वा .शिरवाडकर या महाराष्ट्रातील थोर साहित्यिकांना देशातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेत ही आपल्यासाठी अभिमानात ची बाब आहे म्हणून आपण मराठीतील ग्रंथांचे वाचन केले पाहिजे असा सल्ला त्यांनी आपल्या भाषणातून शेवटी दिला .
याप्रसंगी उपस्थित डॉ बळीराम वानखडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की आपल्या कुटुंबातील मुलांना आपण मराठी भाषेतील शाळांमधूनच शिक्षण दिले पाहिजे .स्पर्धा परीक्षेची तयारी करताना केवळ स्पर्धा परीक्षेचे पुस्तक न वाचता त्यासोबतच इतर पुस्तके सोबत वाचली पाहिजे . वेगवेगळ्या प्रकारच्या वाचनाने आपल्याला सर्वकष ज्ञान प्राप्त होते .अध्यात्मिक ग्रंथांमधून आपणास जीवन कसे जगावे याचा मार्ग मिळतो .रामायणा मधून आपणास संस्कार मिळतात तर महाभारता मधून कर्तव्य परायणता कशी करावी याची समज मिळते
याच कार्यक्रमांमध्ये वाचनालयातील अभ्यासिकेमधील जवरे या विद्यार्थ्यांची रेल्वे लोको पायलट म्हणून नेमणूक झाल्याबद्दल त्यांचा सत्कार वाचनालयाच्या वतीने करण्यात आला .कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचय वाचनालयाचे अध्यक्ष विजय सारभुकन यांनी तर आभार प्रदर्शन लिपिक सौ वर्षा नेमाडे यांनी केले .कार्यक्रमाचे संचालन ग्रंथपाल वृषाली आडोळकर यांनी केले कार्यक्रमाला अभ्यासिकेतील बहुसंख्य विद्यार्थी तथा वाचक वर्ग उपस्थित होता . याच कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली त्यांच्या कार्यावरही प्रकाश टाकण्यात आला .




