शहर प्रतिनिधी,नांदुरा. अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार वडीलाचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. सुखलाल बाबुलाल जाधव वय ४८ रा टाकरखेड असे मृतकाचे नाव असून वैभव वय १३ असे या अपघातातील जखमीचे नाव आहे. ही घटना आज १० फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास मोताळा रोडवर पुंडलिक महाराज महाविद्यालयाजवळ घडली. या प्रकरणी नांदुरा पोलीसांनी अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
या बाबत प्राप्त माहितीनुसार , तालुक्यातील टाकरखेड येथील रहिवासी सुखलाल बाबुलाल जाधव वय ४८ हे मुलगा वैभव वय १३ याच्या सह पलसोडा येथुन आपल्या दुचाकीने ( क्र.एम एच २८ ए व्हि ९९५६ ) नांदुरा मार्गे घरी टाकरखेड येथे जात असताना मोताळा रोडवर शहरा पासुन काही अंतरावर असलेल्या पुंडलीक महाराज महाविद्यालया जवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुखलाल जाधव यांचा मृत्यू झाला तर मुलगा वैभव हा या अपघातात गंभीर जखमी झाला. ही घटना आज दुपारी घडली. अपघात झाल्यानंतर वाहन चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेनंतर मृतकाचे भाऊ श्यामलाल बाबुलाल जाधव वय ५० रा टाकरखेड यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिस ठाण्यात आरोपी अज्ञात वाहन चालका विरोधात अप.क्र.८४/२०२६ कलम १०६ (१), २८१, १२५ (अ) भा. न्या. सं. अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास हे काॅ दिपक सोळंके हे करीत आहेत.




