गणतंत्रदिनी केंद्रीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मान
रामटेक ( प्रतिनिधी )रामटेक नगरपरीषदेचे नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांच्या हस्ते गणतंत्रदिनी नगरपरीषद येथे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण करणार्यांचा सत्कार करण्यात आला.
रामटेक नगरपरीषदेचे नवनियुक्त नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत उतीर्ण झालेल्यांना शाल,श्रीफळ,स्मृतीचिन्ह देवुन सत्कार केला. डाॅ.शुभम गंगाधर महाजन याला केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत सीएमएस एअर मध्ये २२६ रॅंक मिळाली ,कार्तीक बावनकुळे हा युपीएससीत आयईएस तर डॉ.अदिती चौव्हान युपीएससीत सीएमएस परिक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचा सत्कार केला.
यावेळी नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन,मुख्याधिकारी पल्लवी राऊत,नगरपरीषद उपाध्यक्ष आलोक मानकर,नगरसेवक तथा गटनेता सुमित कोठारी,नगरसेवक तथा गटनेता अभिषेक डाहारे,नगरपरीषदचे अधिकारी,कर्मचारी सह आदी उपस्थित होते.




