चंद्रपूर

ट्रॅक्टर पलटून शेतकरी ठार , एक जखमी तळोधी (खुर्द) येथील घटना

शहर प्रतिनिधी ब्रम्हपुरी:ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी जवळील तळोधी (खुर्द) येथील शेतशिवारात तुरी भरलेला ट्रॅक्टर पलटून अपघात झाल्याने ट्रॅक्टर खाली दबून एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना आज दिनांक 12 फेब्रुवारी 2026 ला सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. विश्वनाथ भिवणकर (वय ७० असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून गिरीधर कन्नाके (वय 50) जखमीचे नाव आहे.
शेतातील तुरी घरी आणण्याकरिता विश्वनाथ भिवणकर यांनी गावातीलच गोवर्धन मेश्राम यांचा ट्रॅक्टर शेतावर नेले. घराकडे वापस येत असताना मुई ते तलोधी मार्गावरील गोसेखुर्द कालव्याच्या पारीवर ट्रॅक्टर चालक दीपक आलाम याला तुरी भरलेला ट्रॅक्टर नियंत्रित न झाल्याने ट्रॅक्टर कालव्याच्या पारी वरून खाली उतरून पलटी झाला. ट्रॅक्टर इंजिन वर बसलेले विश्वनाथ भिवणकर यांचा इंजिन खाली दबून जागीच मृत्यू झाला तर गिरीधर कन्नाके हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ट्रॅक्टर चालक दीपक आलम याने उडी मारल्याने अपघातातून सुखरूप बचावला आहे. घटनेने गावात शोककळा पसरली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *