चंद्रपूर विदर्भ

सुधीर मुनगंटीवार आणि विजय वडेट्टीवार आमने सामने

चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भाजपसोबत राहूनच विकास साधला जाऊ शकतो असे वाटत असल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांचा एक गट आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने काँग्रेसचे आमदार व विधानसभा काँग्रेसचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले सुधीर मुनगंटीवार यांचे वक्तव्य हे हवेवर गोष्टी केल्यासारखे आहे. उलट भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक भाजपाच्या संपर्कात असण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येक पक्ष आपापले नगरसेवक सांभाळून आहेत.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने मित्रपक्षांच्या सहकार्याने स्पष्ट बहुमत मिळवत भाजपकडून सत्ता काबीज केली आहे. संघटनात्मक बांधणी, स्थानिक समीकरणे आणि आघाडीतील समन्वय यामुळे काँग्रेसला निर्णायक यश मिळाले, तर सत्तेतील भाजपला प्रचारातील ताकद असूनही पराभव पत्करावा लागला. जनविकास सेनेसह काँग्रेस 30, भाजप 23, उबाठा 6, एमआयएम 1, बसपा 1, वंचित 2, शिंदे सेना 1 तर दोघे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *