कोल्हापूर, दि.०१। प्रतिनिधी संजय राऊतांच्या वक्तव्यावर सखोल चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वे कर यांनी दिले आहेत. यासंबधी हक्कभांगाचा निर्णय ८ मार्चला देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. यावर आता संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्यानं त्यांच्या वक्तव्याचे पडसाद सभागृहात उमटले. संजय राऊतांच्या वक्तव्यावर सखोल चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वे कर यांनी दिले आहेत. यासंबधी हक्कभांगाचा निर्णय ८ मार्चला देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. यावर आता संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हक्कभंग आणल्यास त्याला सामोरं जाईल. तुरूंगात गेलोय, हक्कभंगालातुरूंगात गेलोय, हक्कभंगाला घाबरणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय.हे विधिमंडळ नाही, चोरमंडळ आहे, असं विधान करणं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत येणार असं चित्रं आहे. कारण संजय राऊत यांच्या या विधानाचे विधानसभेत गदारोळ झाला असून राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात आली. विधिमंडळात संजय राऊतांविरोधात यावरुन घोषणाबाजी झाली आणि सभागृहाचे कामकाज अनेकवेळा तहकूब करण्यात आले. संजय राऊत यांनी केलेल्या या विधानानंतर त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. संजय राऊतांच्या एका विधानाने विधानसभेत गदारोळ माजल्यानंतर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर प्रतिक्रिया दिलीय.