हे माझं शेवटचं पत्र…

आपण पुन्हा व्हाईट हाऊस जिंकू, ट्रम्प यांचं समर्थकांना भावनिक पत्रवॉशिंग्टन, दि.२१। वृत्तसंस्था अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात २०१६ च्या निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी यासंदर्भात समर्थकांना ई- मेल पाठवला आहे. या ई-मेलमध्ये कदाचित हे माझं शेवटचं पत्र असू शकतं, असं त्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल आभार. या लढाईत विजय आपलाच होईल आणि आपण पुन्हा व्हाईट हाऊस जिंकू, असंही ट्रम्प यांनी समर्थकांना केलेल्या ई-मेलमध्ये म्हटलं आहे. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तसेच, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंगही करण्यात आलं आहे.

मंगळवारी (२१ मार्च) अटकेबाबत ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर त्यांच्या समर्थकांकडून निदर्शने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आधीपासूनच खबरदारी घेतली जात आहे. ट्रम्प यांच्याविरोधात २०१६ च्या निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. ज्यामध्ये त्यांना दोषी ठरवलं जाण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या प्रकरणी न्यायालयाचा निर्णय येणे बाकी आहे. २०१६च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याची माहिती मिळत आहे. हे प्रकरण एडल्ट फिल्म स्टारशी संबंधित आहे.

ट्रम्प यांचे स्टॉर्मी डॅनियल्ससोबत अफेअर असल्याचा आरोप आहे आणि ही माहिती लपवण्यासाठी त्यांनी २०१६ मध्ये डॅनियल्सला १,३०,००० डॉलर दिल्याचा आरोप आहे. मात्र, येथे मुद्दा पैसे देण्याचा नसून कोणत्या माध्यमातून पैसे देण्यात आले आहे त्यासंदर्भात आहे. त्याचबरोबर ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. असा आरोप आहे की, ट्रम्प यांचे वकील मायकल कोहेन यांनी गुप्तपणे डॅनियल्सला पैसे दिले आणि नंतर हे पैसे ट्रम्प यांच्या एका कंपनीने वकीलांना दिले. त्यानंतर ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असताना या काळात झालेल्या व्यवहारांची चौकशी सुरू झाली. ट्रम्प हे २०१७ ते २०२१ पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा आरोप दाखल झाल्यास, ट्रम्प हे गुन्हा दाखल होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष असतील. मात्र, जर ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा गुन्हा दाखल झाला तर, २०२४ च्या निवडणुकीपूर्वी त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का असेल. दरम्यान, गेल्या आठवड्याच्या शेवटी ट्रम्प यांनी मंगळवारी त्यांना अटक केली जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *