भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. कानपूर कसोटीच्या पहिल्याच दिवशी ग्रीन पार्क स्टेडियममध्ये राडा पाहायला मिळाला. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यादरम्यान बांगलादेशी क्रिकेट चाहता टायगर रॉबीला काही लोकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. आता पोलिसांनी त्या बांगलादेशी क्रिकेट फॅनला रुग्णालयात नेले आहे.
टीम इंडियाच्या काही चाहत्यांनी मारहाण केल्याची निराशाजनक बातमी समोर आली आहे. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला, आणि रॉबीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात न्यावे लागले. भांडणे कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सध्या पावसामुळे कानपूरमधील कसोटी सामना थांबवण्यात आला आहे. या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने 35 षटकात 3 गडी गमावून 107 धावा केल्या आहेत. मुशफिकुर रहीम (6 धावा) आणि मोमिनुल हक (40 धावा) क्रीजवर आहेत. आतापर्यंत वेगवान गोलंदाज आकाशदीपने टीम इंडियासाठी सर्वाधिक 2 विकेट घेतल्या आहेत. रविचंद्रन अश्विनला एक विकेट मिळाली.
भारतीय प्लेइंग-11 : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांगलादेश प्लेइंग-11 : शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.