आयबीएम कंपनीनं तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना दिला नारळ 

मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅमेझॉननंतर आता आयबीएम या कंपनीनं देखील कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयबीएम ने तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना बुधुवारी काढून टाकले आहे. वार्षिक रोखीचे लक्ष्य गाठण्यात कंपनी अपयशी ठरली आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी जेम्स कॅव्हानो यांनी दिली. रॉयटर्सने याबाबतची माहिती दिली आहे.

देशातील सर्वच कंपन्यांना आर्थिक मंदिचा फटका बसत आहे. सातत्यानं कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत आहेत. आर्थिक मंदीचा मोठा फटका कंपन्यांना बसत आहे. त्यामुळं गुंतवणूकदार खर्च कपात करत आहेत. विविध देशातील अनेक दिग्गज कंपन्यांच्या  नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन कंपन्या जागतिक आर्थिक मंदीला सोमोरं जात आहेत. त्यामुळं कंपन्या खर्चात कपात करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *