पुण्यात चंद्रकांत पालटांची सरपंचांसोबत ‘लंच पे चर्चा’

पुणे, 27 जानेवारी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या नियोजित कार्यक्रमानंतर लंच पे चर्चा’च्या माध्यमातून सरपंचांशी संवाद साधला. गावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची सूचना यावेळी त्यांनी सर्वांना केली. पुणे जिल्हा परिषेदेने आयोजित केलेल्या जलजीवन मिशन कार्यशाळेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर पालकमंत्री पुढील कार्यक्रमास निघणार होते. जेवणाचीही वेळ झाली असल्याने तसेच सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसोबत थेट संवाद साधण्याची संधी असल्याने त्यांच्यासोबतच भोजन करण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला. त्यांनी काही महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. जलजीवन मिशन ग्रामीण भागासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याची भावना यावेळी महिला सरपंचांनी व्यक्त केली.

या जलजीवन मिशन कार्यशाळेत पुरुष सरपंच्यांसोबत महिला संरपंचदेखील सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक चर्चेत महिलांनी आपले प्रश्न मांडले. गावाच्या विकासासाठी त्यांचाही मोठा सहभाग असल्याचं महिलांनी सांगितलं. अनेक तरुण महिला सरपंचांचाही यात मोठा सहभाग होता. महिलांना गावाकरीता काय करणं अपेक्षित आहे आणि त्या काय काय करु शकतात, अशा सगळ्या प्रश्नांवर चंद्रकांत पाटील यांच्याशी महिलांनी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *