राजकारणी आहोत, साधू-संत नाही… जिंकण्यासाठीच आलो आहोत

नवी दिल्ली, दि.०६। प्रतिनिधी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. सार्वजनिक मंचावरही गडकरी आपले म्हणणे अगदी स्पष्टपणे मांडतात. आजतकच्या बजेट कॉन्क्लेव्हमध्येही बोलताना गडकरींनी इलेक्ट्रिक वाहन, एक्स्प्रेस-वेपासून ते बजेटपर्यंत चर्चा केली. सोबतच गडकरींनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवरही महत्वाची प्रतिक्रिया दिली. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मोफत अन्नधान्य, करमाफी आणि इतर दिलासे दिले जात आहेत? या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, प्रत्येक नेता निवडणुका डोळ्यासमोर ठेवत असतो, आम्हीही तेच करतोय. आम्ही राजकारणी आहोत, साधू-संत नाही. आम्ही इथे पूजा-पाठ करायला आलो नाहीत. आम्ही निवडणूक जिंकण्यासाठीच आलो आहोत.

चांगले काम केले तर पुढे जिंकू. जो चांगले काम करेल, जनता त्यालाच पुढच्या वेळे निवडून देईल. म्हणूनच आम्ही काम करतो आणि निवडून येतो, असे गडकरी म्हणाले. प्रत्येक राज्यात रस्त्यांची कामे सुरू यावर्षी ९ राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. निवडणुका आल्या की प्रकल्प सुरू होतात, असे विरोधकांचे म्हणणे आहे. यावर गडकरी म्हणाले की, असे कोणते राज्य आहे जिथे रस्ते बांधले जात नाहीत. सर्व राज्यांमध्ये रस्त्यांची कामे सुरू आहेत. प्रत्येक राज्यात रस्ते बांधले जात आहेत. एकाही राज्याचे नाव सांगा, जिथे रस्ता बांधला जात नाहीय. सर्व राज्यांमध्ये रस्ते बांधले जात आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली. मी कमिटमेंट नाही, टार्गेट ठरवतो यंदाच्या निवडणुकीसाठी काय टार्गे ट आहे, या प्रश्नावर नितीन गडकरी म्हणाले की, मी निवडणुकीनुसार विचार करत नाही आणि सांगतही नाही. मी काम करत राहतो आणि काम करत राहायलाच हवं. मला माझे टार्गेट सांगण्याचीगरज नाही. २०२४ च्या अखेरपर्यंत भारतातील रस्ते आणि पायाभूत सुविधा यूएसएप्रमाणे होतील, हे आमचे टार्गेट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *