मी बोहरा कुटुंबातील सदस्य आहे. माझ्या ४ पिढ्या बोहरा मुस्लीम समाजासोबत गेल्या आहेत. त्यामुळे बोहरा समाज आणि माझं नातं जुनं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या समाजाने वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केलं आहे. आज अल्जामिया-तुस-सैङ्कियाह सारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. पाण्याच्या संवर्धनात बोहरा समाजाचे मोठं काम आहे. परदेशात गेलो तरी बोहरा समाजातील बांधव भेटण्यासाठी येतात. त्यांचे भारतावर प्रेम आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. कुपोषण ते जलसंवर्धनाच्या अभियानापर्यंत समाज आणि सरकार मिळून एक ताकद बनू शकते. अशा प्रकारची कामं आम्ही मिळून केली आहेत. मी देशाताच नाही तर, परदेशातही गेल्यानंतर माझे बोहरा भाऊ-बहीण मला अवश्य भेटायला येतात. तुमचं हे प्रेम मला सारखं आकर्षित करतं. जेव्हा तुम्ही मुंबई qकवा सुरतला भेट द्याल, तेव्हा तुम्ही एकदा दांडी यात्रा करावी, असा माझा आग्रह आहे.