लडंन, दि.१५। गेल्या सप्टेंबरमध्ये राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर या वर्षी ६ मे रोजी राजा चाल्र्सचा अधिकृतपणे राज्याभिषेक होईल. ब्रिटनचे नवे राजे चाल्र्स तिसरे यांच्या पत्नी कॅमिला मे महिन्यात झालेल्या राज्याभिषेकादरम्यान कोहिनूर मुकुट परिधान करणार नाहीत. बqकगहॅम पॅलेसने ही घोषणा केली. भारतासोबतचे संबंध लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅमिला या ६ मे रोजी क्वीन कन्सोर्ट म्हणून राज्याभिषेक करणार आहेत. यामध्ये त्यांना क्वीन मेरीचा मुकुट घातला जाईल, जो पुन्हा रिसाइज करण्यासाठी देण्यात आला आहे. कोहिनूर हिरा qकग जॉर्ज सहावा यांच्या पत्नी राणी एलिझाबेथ यांच्या मुकुटात बसवण्यात आला होता आणि तेव्हापासून हा हिरा ब्रिटिश राजघराण्यातील महिलांच्या मुकुटाचा भाग आहे. काही बदलांसह विद्यमान मुकुट पुन्हा वापरण्याची ही पहिलीच वेळ असेल.
राणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे कलीनन खखख, खत आणि त हिरे मुकुटात जोडले जातील. हा मुकुट १०० वर्षांहून जुना आहे आणि १९११ मध्ये क्वीन मेरीने घातला होता. राणी एलिझाबेथ खख यांनी घोषणा केली होती की कॅमिला क्वीन कन्सोर्ट म्हणून ओळखल्या जातील. कॅमिला, ज्या ७५ वर्षांच्या आहेत, कॉर्नवॉलच्या डचेस आहेत. त्या qकग चाल्र्स यांच्या दुसèया पत्नी आहेत. राजकुमारी डायनाच्या मृत्यूनंतर चाल्र्स यांनी कॅमिला यांच्याशी लग्न केले होते. राज्याभिषेकानंतर कॅमिला यांना कोणत्याही प्रकारची घटनात्मक शक्ती नसेल. मात्र, त्यांची पदवी ब्रिटनच्या राणीसारखीच राहणार आहे. प्रिन्सेस डायनाच्या मृत्यूनंतर प्रिन्स चाल्र्स यांनी एप्रिल २००५ मध्ये कॅमिला यांच्याशी लग्न केले. लग्नसोहळ्यानंतर काढलेल्या या ङ्कोटोत ब्रिटनचे राजघराणे दिसत आहे. भारताने ब्रिटनसमोर अनेकवेळा कोहिनूर हिèयावर आपला कायदेशीर हक्क सांगितला आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये अनेकदा दुरावा निर्माण झाला आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर कोहिनूर हिरा भारतात परत आणण्याची मागणी करण्यात आली होती.