बौद्ध धम्म पदयात्रेच्या समारोपाला चैत्यभूमीवर उसळला लाखोंचा जनसागर

दि.१५। प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय बोद्ध भिक्खू संघ थायलंड येथील ११० भिक्खूचा सहभाग असलेली तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थीधातु कलश घेऊन परभणी ते चैत्यभुमी अशी निघालेल्या देशातील पहिल्या बौद्ध धम्म पदयात्रेचा आज चैत्यभूमीवर लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत समारोप झाला यावेळी बौद्ध विचार जागृत करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत असे आवाहन थायलंड येथील भदंत ब्रम्हवरजीराकॉर्न यांनी केले.. १७ जानेवारी रोजी परभणी ते चैत्यभुमी दादर अशी भारतातील पहिली बोद्ध धम्म पदयात्रा निघाली यात तथागत गौतम बौद्ध यांचे अस्थिकलश घेऊन थायलंड येथील आंतरराष्ट्रीय भिक्खू संघाचे ११० भिक्खु सहभागी झाले होते..आज तब्बल ५७० किलोमीटरचा प्रवास करून हि पदयात्रा दादर येथील चैत्यभुमीवर पोचली या ऐतिहासिक बौद्ध धम्म पदयात्रेचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. आज सकाळी हि यात्रा घाटकोपर येथून सुरु होऊन कामराज नगर-पंचशील नगर- चेंबूर,कुर्ला-आणभाऊ साठे उद्यान-सुमन नगर-सायन-माटुंगा सर्कल-दादर सर्कल-दादर प्लाझा-शिवाजी पार्क मार्गे दादर चैत्यभूमीवर सकाळी ११ वाजता पोहोचली. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत चैत्यभूमीवर या धम्म पदयात्रेचा समारोप झाला आज पार पडलेल्या समारोप कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित होते…

यावेळी या भव्य धम्म पदयात्रेच्या समारोप प्रसंगी थायलंड येथील भदंत ब्रम्हवरजिराकॉर्न,केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले,राज्याच्या माजी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड,अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोटियारिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराव आंबेडकर,भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर,भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, आयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअ ंबीरे,सिने अभिनेते तथा धम्मदूत गगन मलिक यांच्यासह लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होते. भारतात निघालेल्या या बोद्ध धम्म पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून आम्ही धन्य झालो आहोत..परभणी पासुन निघालो ते इथे चैत्यभूमीवर येईपर्यंत ठिकठिकाणी लाखो लोक आमचे स्वागत करत होते.. हे अभूतपूर्व असुन सर्वांनी शांतीचा मार्ग अवलंबला पाहिजे,त्रिशरण पंचाशीलाचे पालन करून विपश्यना करणे ही आवश्यक आहे.बौद्धांचे वीचार जगाला दिशा देणारे आहेत त्यासाठी सर्वांनी बौद्ध विचार जागृत करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन थायलंड येथील भदंत ब्रम्हवरजिराकॉर्न यांनी केले.. माजी शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी हा जमलेला हा जनसमुदाय तथागत गौतम बौद्ध,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना नतमस्तक होण्यासाठी इथे जमलाय.आज सर्व जण इथे एकत्रित आले आहेत ही एकीच भविष्यात मोठा बदल घडवू शकते असे प्रतिपादन केले.

तसेच भीमराव आंबेडकर यांनी ही यात्रा अतिशय अभूतपूर्व होती ५७० किलोमीटर पायी चालणे सोपे नाही हे बौद्धांचे विचारच हे घडवून आणू शकतात.भारतात गौतम बौद्ध यांच्या अस्थी अनेक ठिकाणी आहेत मात्र त्या बंदिस्त आहेत त्या सर्व अस्थी सामान्यांना दर्शन घेण्यासाठी आपण मोकळ्या करून असे ओशासन दिले..आनंदराज आंबेडकर यांनीही ही यात्रा ऐतिहासिक ठरली असुन शांती आणि समतेचा मार्ग या यात्रेने सर्वांना दिला आहे आज भारतात गौतम बौद्धांच्या अनेक पौराणिक वास्तू भारतात आहेत त्या शासकीय पाशात अडकल्या आहेत त्या मोकळ्या करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.. तर या यात्रेचे आयोजक डॉक्टर सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी बौद्धांचा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन परभणीहून निघालेली ही बौद्ध धम्म पदयात्रा देशासाठी क्रांतिकारी ठरणार आहे कारण परभणी पासून जालना औरंगाबाद नाशिक ठाणे आणि चैत्यभूमी या सर्व ठिकाणी जो अभूतपूर्व प्रतिसाद या यात्रेला मिळाला आहे तो ऐतिहासिक आहे.. पहिल्यांदाच देशात ही पदयात्रा पार पडलीय तथागत गौतम बुद्ध यांचे विचार सर्वत्र पसरावे या उदात्त हेतूनेच आम्ही या यात्रेला सुरुवात केली होती आणि यापुढेही तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असणार असल्याचे हत्तीअंबीरे म्हणाले.. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ भिमराव खाडे आणि भाई किर्तीकुमार बुरांडे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ भगवान धुतमल,भगवान जगताप,प्रा, संजय जाधव, सुधिर कांबळे, पंकज खेडेकर, प्रा.राजेश रणखांब,अमोल धाडवे, आदींनी परिश्रम घेतले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *