भावी मुख्यमंत्री जयंत पाटील… समर्थकांकडून मुंबईत बॅनरबाजी

 दि.१५। प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उद्या १६ ङ्केब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील घरातील परिसराजवळ समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे. बॅनरबाजी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मुंबईमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवर जयंत पाटलांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. जयंत पाटील यांच्या मुंबईतील नेपियन्सी रोडवरील घराबाहेर हे पोस्टर लावण्यात आले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस मलबार हिल तालुका यांच्याकडून हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर बॉस, माझं दैवत असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच यावर संतोष पवार आणि हितेंद्र सावंतया पोस्टर्सवर बॉस, माझं दैवत असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच यावर संतोष पवार आणि हितेंद्र सावंत या दोन पदाधिकाèयांचे ङ्कोटो लावण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. भावनिक कार्यकर्ते काय करतील ते सांगता येत नाही. उगाच कुणी तरी बोर्ड लावला तर आपण चर्चा करू नये, असं रोहित पवार म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *